विशेष प्रतिनिधी
मुंबई : अर्थसंकल्पात कोकणवर अन्याय झाल्याचा आरोप करत आमदार नितेश राणे यांनी सिंधूदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. पालकमंत्री म्हणजे पुष्पा सिनेमातल्या डायलॉग सारखे आहेत. ना फ्लॉवर है, ना बटर है, फक्त बटरफ्लाय आहे, असे त्यांनी म्हटले आहे.There is no flower, there is no butter, only butterfly, Nitesh Rane targets Uday Samant
नितेश राणे यांनी महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पावर टीका करत हल्लाबोल केला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला निधी मिळाला मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याला काहीच मिळाले नाही असे म्हणत त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्याला फक्त 14 कोटींचा भरीव निधी दिला गेला.
पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत, कॅबिनेटला उपस्थित राहत नाहीत. रत्नागिरी विमानतळाला 100 कोटी रुपये दिले मात्र, सिंधुदुर्गला काहीच नाही.नेमक आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला या सत्ताधारी महाविकास आघाडीने अर्थसंकल्पात काय दिले? जिल्ह्याला अधोगती घेऊन जायचे हा एककलमी कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारचा आणि शिवसेनेच्या नेत्यांचा आहे.
राणे म्हणाले की, सिंधुरत्न मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली योजना, या योजनेसाठी अर्थसंकल्पात एक रुपयाची देखील तरतूद नाही. मग ही योजना केलीच कशाला? महाविकास आघाडी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात कोकणाच्या वाटेला काय आले असे विचारावेसे वाटत. कोकणातल्या सत्ताधारी लोकांना अर्थसंकल्प खरंच कळला का?
असा मला प्रश्न विचारावासा वाटतो. काही घोषणा परत-परत केल्या आहेत. पहिल्या अर्थसंकल्पावेळीही मुख्यमंत्री यांनी भाषण केले होत तेव्हा ते म्हणाले होते की, नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये दिले जाईल.
देवेंद्र फडणवीस यांना मुंबई सायबर पोलिसांनी फोन टॅपिंग प्रकरणी एक नोटीस बजावली आहे. त्यावर राणे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारविरोधात बोलणाºया भाजप नेत्याला अडकवले जात आहे. पण मी महाविकास आघाडी सरकारला सांगतो की, देवेंद्र फडणवीस हा तुमचा बाप आहे. गोवा आणि उत्तरप्रदेशात म्याव म्यावचा आवाज नाही आला. म्हणून बघून आपले पाय पसरायचे असतात. मोदींचा फोटो लावला तर काय अवस्था होते ते बघा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App