विशेष प्रतिनिधी
मुंबई : वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद घेऊन देशभरातील गॅस सिलेंडर तुटवड्याचा विरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी उद्या 6 एप्रिल 2026 रोजी “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर?” या राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली.
देशभरात गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुजरा मोदीच्या देश विकण्याच्या आर्थिक नितीमुळे देशात गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा झाला आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीने केला.
– गॅस सिलेंडरचा काळाबाजार
महिला, गृहिणी, मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅससाठी तासन्तास लांब रांगेत उभे राहावे लागत आहे, तरीही गॅस मिळत नाही. गॅस सिलेंडरची काळाबाजार सुरू आहे. 912 रुपयांचा सिलेंडर काळाबाजारात 5000 ते 7500 रुपयांना विकला जात आहे.
भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी प्रत्येक जिल्हा, शहर, तालुका ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर आंदोलन” 6 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयाच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्ता उत्कर्षा रूपवते, मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, महिला आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी आणि युवा आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर गवई पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App