अदानी ग्रुपच्या शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांचे मूल्य गेल्या वर्षभरात पाच पट वाढले आहे. या कंपन्यांचे मूल्य गेल्य वषर्क्ष १.६४ लाख कोटी रुपये होते. ते ८.५ लाख कोटी रुपये झाले आहे. त्यामुळे गेल्या वर्षी ज्यांनी दहा हजार रुपये गुंतविले होते त्याचे मूल्य वर्षभरातच ५२ हजार रुपये झाले आहे.The value of Adani Group companies has increased five times in a year, from Rs 10,000 to Rs 52,000
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अदानी ग्रुपच्या शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांचे मूल्य गेल्या वर्षभरात पाच पट वाढले आहे. या कंपन्यांचे मूल्य गेल्य वषर्क्ष १.६४ लाख कोटी रुपये होते. ते ८.५ लाख कोटी रुपये झाले आहे. त्यामुळे गेल्या वर्षी ज्यांनी दहा हजार रुपये गुंतविले होते त्याचे मूल्य वर्षभरातच ५२ हजार रुपये झाले आहे.
अदानी गु्रपमधील सहापैकी चार कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एक लाख कोटी रुपये वाढ करून दिली आहे. त्याचबरोबर अदानी ग्रुपचे मालक गौतम अदानी हे आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत.
त्यांची एकूण मालमत्ता 66.5 अब्ज डॉलर्स आहे. यावर्षी त्यांची संपत्ती 33 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. म्हणजेच जवळपास 100 टक्के वाढ झाली. आशियात पहिल्या क्रमांकावर रिलायन्सचे मुकेश अंबानी आहेत, ज्यांची एकूण संपत्ती 76.5 अब्ज डॉलर आहे. ब्लूमबर्गच्या बिलिनेयर इंडेक्स रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
इंफ्रास्ट्रक्चरपासून रिन्यूएबल एनर्जीमध्येही काम करत असलेल्या गौतम अदाणींनी चीनच्या बेवरेजेस येथून फार्मामध्ये काम करत असलेल्या कंपनीचे मालक झौंग शानशान यांना मागे टाकले आहे. शानशान यांची संपत्ती 63.6 अब्ज डॉलर आहे.
जागतिक स्तराचा विचार केल्यास अंबानी यावेळी 13 वे श्रीमंत उद्योगपती आहेत तर अदाणी हे 14 व्या क्रमांकावर आहेत. अदानींच्या संपत्तीमध्ये गेल्या एका वषार्पासून जबरदस्त तेजी आली आहे. मे 2020 पासून आतापर्यंत त्यांच्या लिस्टेड कंपन्यांच्या शेअरमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
शेअर बाजारात चढ-उतार झाला, अदानींच्या कंपनींचे शेअर नेहमीच वर राहतात आणि प्रत्येक आठवड्यात एका नव्या भावाचा विक्रम बनवतात.अदानींच्या लिस्टेड 6 कंपन्यांचे मार्केट कॅप एका वर्षात 41.2 टक्के वाढले आहे.
अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे मार्केट कॅप 8.६4 लाख कोटी रुपये आहे. गेल्या वषी मार्केट कॅप 20 अब्ज डॉलर होते. जे आता 115 अब्ज डॉलर आहे. म्हणजेच यामध्ये 6 पटींनी वाढ झाली आहे.
गेल्या 1 वर्षात अदानी टोटल गॅस शेअर्स 114 पट वाढले आहेत, जे सर्वाधिक वाढणारे शेअर आहेत. अदानी इंटरप्राइजेजचे शेअर 82 पटींनी वाढले आहे. अदानी ट्रान्समिशनचे शेअर 61 पटींनी वाढले आहे.
अदानी ग्रीन एनजीर्चे शेअर 43 पट व अदानी पावरचे शेअर 18 पटीपेक्षा जास्त वाढले आहे. अदानी ग्रुप सध्या बंदर, विमानतळ, ऊर्जा, संसाधने, लॉजिस्टिक, पॅकेज्ड फूड्स, अॅग्री बिझिनेस, रिअल इस्टेट, फायनान्शिअल सर्व्हिसेस, गॅस आणि डिफेन्सशी संबंधित उत्पादनांमध्ये गुंतलेला आहे.
दोन कंपन्यांचे शेअर्स 100 पेक्षा जास्त पटींनी वाढले आहेत. विशेषत: अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स सध्या 1400 रुपयांच्या आसपास व्यापार आहेत. अदानीच्या 6 कंपन्यांमध्ये अदानी गॅस विदेशी कंपनी टोटलसोबत टायअप करुन गॅसचा पुरवठा करते.
अदानी ट्रान्समिशन जे आहे ते लॉजिस्टिक आणि इतर क्षेत्रात आहे. अदानी एन्टरप्राइजेस विमानतळ आणि रियल्टी इतरमध्ये आहे. अदानी पॉवर वीजपुरवठा क्षेत्रात आहे. ग्रीन एनर्जीमध्ये अदानी ग्रीन एनर्जी काम करते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App