जळगाव जिल्ह्याचे सुपुत्राला पठाणकोटमध्ये कर्तव्य बजावत असताना आले वीरमरण

मंगलसिंग अठराव्या वर्षीच सैन्यात दाखल झाले होते. ते भारतीय सैन्यात ईएमई विभागात नायक पदावर कार्यरत होते. The son of Jalgaon district died while on duty in Pathankot


विशेष प्रतिनिधी

जळगाव : जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र मंगलसिंग विजयसिंग परदेशी यांना पठाणकोट येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. गोळी लागल्यामुळे मंगलसिंग यांना वीरमरण आले.मंगलसिंग यांच्यावर मंगळवार १६ नोव्हेंबर २०२१ रोजी सावखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.मंगलसिंग हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सावखेडाचे आहेत.



मंगलसिंग अठराव्या वर्षीच सैन्यात दाखल झाले होते. ते भारतीय सैन्यात ईएमई विभागात नायक पदावर कार्यरत होते. त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण सावखेडातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले होते. बालपणापासूनच त्यांना देशसेवेची आवड होती.मंगलसिंग यांच्या पश्चात आई-वडील, दोन मोठे भाऊ, पत्नी आणि तीन अपत्य असा मोठा परिवार आहे.

The son of Jalgaon district died while on duty in Pathankot

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub