काल सोमवारी संपात सहभागी असलेल्या २४५ कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले तर १० कर्मचार्यांची सेवा समाप्त करण्यात आली The salaries of ST employees who are present at regular work will be paid today
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मागील एक महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण पाहिजे या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. दरम्यान बऱ्याच प्रयत्नानंतर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली. परंतु कर्मचारी विलीनीकरण मागणीवर ठाम राहिले.
दरम्यान सरकारने निलंबनाची कारवाई सुरू केली .जे कर्मचारी कामावर हजर राहणार नाहीत त्यांचे निलंबन करण्यात येत आहे. दरम्यान जे कर्मचारी कामावर रुजू झाले त्यांच्या पगारात वाढ करून त्यांचा पगार आज देण्यात येणार आहेत.राज्य सरकारने एक परिपत्रक जारी करून एस. टी. कर्मचार्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे गाजर आंदोलन, संतप्त एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम; पगारवाढ अमान्य
तसेच दर महिन्याच्या १० तारखेच्या आत कर्मचार्यांचे वेतन देण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.त्यानुसार नियमित कामावर हजर असलेल्या कर्मचार्यांचे वेतन आज मंगळवारी जमा होणार आहे.दरम्यान, काल सोमवारी संपात सहभागी असलेल्या २४५ कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले तर १० कर्मचार्यांची सेवा समाप्त करण्यात आली.
रविवारपर्यंत ९,६२५ कर्मचार्यांचे निलंबन, तर १,९९० कर्मचार्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.राज्य सरकार संप करणाऱ्या एसटी कर्मचार्यांवर मेस्मा लावण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत होण्याची शक्यता आहे. सोबतच मेस्मा लावल्याने काय परिणाम होणार यावरही चर्चा होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App