विशेष प्रतिनिधी
सोलापूर : अनेक दिवसांपासून उच्छाद मांडणाऱ्या एका खंडणीखोराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. The police caught ransom seeker in Barshi; Overcast for several days
समाधान, असे आरोपीचे नाव आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये मागच्या कांही दिवसांपासून या खंडणीखोरांचा उच्छाद मांडला होता. खडी क्रशर व्यावसायिक सुनील भराडिया यांना वारंवार धमक्या देऊन ५ लाख रुपये खंडणी देण्याची मागणी करण्यात येत होती, कालच त्यांना धक्काबुक्की करून खंडणीखोराने ५० हजार रुपये वसुल देखील केले होते.
याबाबत काल बार्शी तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आज खंडणीखोर समाधान याला बार्शी पोलिसांनी कुर्डुवाडी – टेम्भूर्णी परिसरातून अटक केली आहे. त्याला बार्शी कोर्टाने येत्या १५ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App