विशेष प्रतिनिधी
पुणे : एका खरेदी खताच्या नोंदणीच्या निमित्ताने सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्र 13, पुणे शहर या काकडे प्लाझा येथील कार्यालयात आठवड्यात दुसऱ्यांदा जाण्याचा योग आला आणि शासनाच्या बिफिकीर कारभाराचा संताप आला.येथील दुरावस्था बघून सामान्य नागरिकांच्या प्रती शासन किती असंवेदनशील असू शकते याचा प्रत्यय आला, असा अनुभव भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी सांगितला. The plight of registration offices that generate the highest revenue for the government Sandeep Khardekar’s warning of agitation
ते म्हणाले ” एकदा येथे आल्यावर संबंध दिवस जातो हे तर ओघाने आलेच, पण कधीकधी कितीही दिवस लागू शकतात. याच्या कारणांचा शोध घेतला असताकधी साहेब व्हिजिटला तर कधी सर्व्हर डाऊन. तो कितीही वेळा डाऊन होऊ शकतो. अतिशय छोट्या जागेत कार्यालय,
आलेल्या नागरिकांना ज्यात महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसह आलेल्या भगिनी अशांना बसायला देखील जागा नाही, एकच बाकडे आणि तब्ब्ल 100/200 नागरिक उभे, ना पाण्याची सोय ना बसण्याची.”
सर्वत्र अडगळ आणि महत्वाचे म्हणजे नागरिकांची सनदचे दोन फलक, यातला कोणता कालावधी पकडायचा हे गुलदास्त्यात. ज्या खात्यातून सर्वाधिक महसूल उत्पन्न मिळते त्याच्या कार्यालयांची कमी अधिक प्रमाणात अशीच अवस्था असल्याचे तेथे थांबलेले नागरिक व वकील मंडळी सांगत होती. ही स्थिती कधी सुधारणार असा सवाल संदीप खर्डेकर यांनी विचारला असून लवकरच या विषयावर आंदोलन उभारणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App