अंधेरीतील शिवसेनेच्या विजयाचा गाजावाजा; पण बाकीच्या पोटनिवडणुकीत भाजपचा डंका

प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशभरात 6 राज्यांमधल्या 7 विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकांचे निकाल लागल्यावर मराठी प्रसार माध्यमांनी अंधेरीतल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विजयाचा गाजावाजा केला आहे, पण प्रत्यक्षात देशभरातल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपने आपल्या विजयाचा डंका वाजवला आहे. 7 पैकी 4 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे, तर 1 जागा लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला, तर दुसरी जागा तेलंगण राष्ट्र समितीला मिळाली आहे. The noise of Shiv Sena’s victory in Andheri

याचा अर्थ पोटनिवडणुकीतला सामना भाजप विरुद्ध प्रादेशिक पक्ष असा झाला असून त्यात आकड्यांच्या हिशेबात भाजपने प्रादेशिक पक्षांवर मात केलेली दिसली आहे. काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाचे अस्तित्व तिथे दिसलेले नाही.

देशातील 6 राज्यांतील या 7 विधानसभा जागांवर 3 नोव्हेंबरला मतदान झाले होते. त्यानंतर आज त्याचे निकाल लागले. यात बिहारमधील 2 आणि महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, तेलंगणा, ओडिशातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. बिहारमधील मोकामा आणि गोपालगंज जागेसाठी पोटनिवडणूक झाली, तर हरियाणातील आदमपूर, तेलंगणातील मुनुगोडे आणि ओडिशातील धामनगर जागेसाठी पोटनिवडणूक झाली आहे.

देशातील 6 राज्यांतील 7 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत मोकामामध्ये आरजेडी आणि अंधेरीच्या जागेवर उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली आहे. बिहारमधील गोपालगंज, उत्तर प्रदेशमधील गोला गोरखनाथ, ओडिशातील धामनगर आणि हरियाणातील आदमपूरमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. तेलंगणातील मुनुगोडेमध्ये टीआरएसने विजय मिळवला आहे.

यापैकी अंधेरीत सर्वात कमी म्हणजे 31.74% मतदान झाले होते, तर धामनगर मध्ये 66% मतदान झाले होते. बाकी सर्व मतदारसंघांमध्ये 55 % च्या वर मतदान झाले होते. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपपासून फारकत घेतल्यानंतर गोपालगंज विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने राष्ट्रीय जनता दलाकडून जागा खेचून घेतली आहे, तर ओडिशातल्या धामनगर मध्ये देखील बिजू जनता दलाचे वर्चस्व असताना विजय मिळवला आहे.

The noise of Shiv Sena’s victory in Andheri

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात