नाशिक : मुंबई महापालिकेकडे फक्त 140 PADU मशीन्स आली आहेत त्यांचा वापरही केवळ अपवादात्मक होणार आहे पण फक्त “पाडू”, हा शब्द आल्याबरोबर ठाकरे बंधू घाबरले आणि त्यांनी “पाडू” मशीन विरोधात पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला घेतले.
PADU म्हणजे प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट ही मशीन्स इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला जोडून त्याद्वारे मतमोजणीची सोय होऊ शकते जर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आयत्या वेळेला बंद पडली, तर मतमोजणीची खोट होऊ नये म्हणून PADU मशीन द्वारे मतमोजणी करायची सोय मुंबई महापालिकेने करून घेतली त्यासाठी 140 मशीन मागवली. यासंदर्भात भूषण गगराणी यांनी स्पष्ट खुलासा केला केवळ अपवादात्मक परिस्थितीत “पाडू” मशीन वापरू. गरज असेल तिथेच ती मशीन वापरू. एरवी ती मशीन वापरणार सुद्धा नाही, असे भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले.
– फक्त ठाकरे बंधूंचा आक्षेप
पण ठाकरे बंधूंनी “पाडू” मशीन वरच आक्षेप घेतला. ही मशीन कुठल्याही राजकीय पक्षाला दाखवली नाहीत निवडणूक आयोगाने परस्पर ती मशीन वापरायचा निर्णय घेतला. सरकारला हवं ते करतायेत हे आम्ही चालू देणार नाही, असे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरच्या पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबईमध्ये प्रचार संपल्यानंतरही मतदारांची संपर्क साधण्याची मुभा निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना दिली पण ठाकरे बंधूंनी त्या निर्णयावर सुद्धा टीका केली.
– पवार आणि सुप्रिया सुळे यांचा आक्षेप नाही
पण ठाकरे बंधूंचा सगळ्यात मोठा आक्षेप “पाडू” नावाच्या मशीन वरच ठरला या मशीनचे नाव एवढे विनोदी निघाले की केवळ “पाडू” या शब्दामुळे ठाकरे बंधू घाबरले. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या पाठोपाठ त्यांनी पाडू मशीन वर सुद्धा अक्षय घेतला. राहुल गांधींनी वोट चोरीचा आरोप केल्यानंतर ठाकरे बंधू सुद्धा त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते, पण शरद पवार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी मात्र राहुल गांधींना पाठिंबा दिला नाही. ते इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या बाजूने उभे राहिले त्याचबरोबर “पाडू” मशीन वर सुद्धा पवारांनी आक्षेप घेतल्याचे उदाहरण सापडले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App