राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा हेतू काही चांगला दिसत नव्हता. एसटी कामगारांच्या भावना तीव्र असल्या तरी व्यक्त करण्याची ही पद्धत नाही. शरद पवारांना इजा करण्याणा हेतू होता, असा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला आहे.The motive behind the attack on Sharad Pawar’s house is not good. Neelam Gorhe’s warning
विशेष प्रतिनिधी
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा हेतू काही चांगला दिसत नव्हता. एसटी कामगारांच्या भावना तीव्र असल्या तरी व्यक्त करण्याची ही पद्धत नाही. शरद पवारांना इजा करण्याणा हेतू होता, असा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या,
मी स्वतः ही एसटी कामगारांना समजावण्याचा प्रयत्न बैठक घेऊन केला होता. पण न्यायालयात प्रकरण होते. उद्रेक आहे असे सांगून पांघरूण घालण्याचा प्रयत्न होतोय यावरून त्यांचे सल्लागार कोण आहेत ते कळतेच आहे. पोलिस या मागच्या लोकांचाही शोध घेतीलच. ग्रुहमंत्री अपयशी ठरले, पोलिस अपयशी आले असे म्हणता येणार नाही, त्यांचा तपास सुरू आहे. कालही पोलिस लगेच गेले. त्यांनी प्रकार थांबवला.
मात्र तरीही आधी कळायला हवे होते अशी अपेक्षा व्यक्त करत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, रोज एसटी कामगार तिथे यायचे. पोलिस बंदोबस्त होता. मागील दरवाजा बंदच केला आहे. कोणत्याही आंदोलनात असे होऊ नये. सरकार प्रयत्न करत आहेच. असे होत असेल तर कोणीतरी आंदोलनात भावना भडकावत आहे. पोलिस तपासात सगळे पुढे येईलच.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App