प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला नको होता, असे मत शरद पवारांनी व्यक्त केल्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी त्या पुढील त्या पुढे जाऊन मूळात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा द्यायला नको होता. त्यांनी राजीनामा दिला नसता तर 16 आमदार त्याचवेळी अपात्र झाले असते, इतकेच नाही तर नानांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष पद भरले असते तर ही आजची वेळच आली नसती असा दावा अजितदादांनी केला आहे. विधानसभेचे अध्यक्ष पद रिकामे ठेवणे ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची चूक होती, असा टोलाही अजितदादांनी महाविकास आघाडीच्या सर्वोच्च नेत्यांना लगावला आहे.The mistake of the Mahavikas Aghadi is to keep the post of the Speaker of the Vidhan Sabha vacant after Nana’s resignation
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदे – फडणवीस सरकार स्थिर होताना विरोधक पूर्ण अस्वस्थ एकमेकांच्या चुका काढू लागले आहेत, याचे निदर्शक आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा देतील हे तुम्ही स्वप्नातही आणू नका. कारण अटल बिहारी वाजपेयी यांच्या वेळची राजकीय उंची असणारी माणसे वेगळी होती. आताची माणसे वेगळी आहेत, असे शरसंधान अजितदादांनी शिंदे फडणवीसांवर सोडले पण तो बाण उद्धव ठाकरेंच्या दिशेने गेला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App