तोक्ते चक्रीवादळात सापडलेल्यांच्या मदतीला भारतीय नौदल धावून आले आहे. नौदलाच्या बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी आयएनएस कोची आणि कोलकाता यांच्या बरोबरीने शोध आणि बचाव कार्यास सुरुवात केली आहे. मुंबईच्या किनाऱ्याजवळील विकसन क्षेत्रात मुंबईपासून 35 सागरी मैल अंतरावर बुडालेल्या पी- ३०५ या बुडालेल्या नौकेतील १८० जणांचे प्राण वाचविण्यात नौदलाला यश आले आहे.The Indian Navy rushed to the spot and rescued more than 200 people
विशेष प्रतिनिधी
मुंबई : तोक्ते चक्रीवादळात सापडलेल्यांच्या मदतीला भारतीय नौदल धावून आले आहे. नौदलाच्या बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी आयएनएस कोची आणि कोलकाता यांच्या बरोबरीने शोध आणि बचाव कार्यास सुरुवात केली आहे.
मुंबईच्या किनाऱ्याजवळील विकसन क्षेत्रात मुंबईपासून 35 सागरी मैल अंतरावर बुडालेल्या पी- ३०५ या बुडालेल्या नौकेतील १८० जणांचे प्राण वाचविण्यात नौदलाला यश आले आहे.
दुसºया मोहिमेत भारतीय नौदलाचे ‘सी-किंग’ हेलिकॉप्टर जीएएल कन्स्ट्रक्टर या नौकेवरील कर्मचाºयांच्या सुटकेसाठी रवाना करण्यात आले होते. मुंबईच्या उत्तरेला ही नौका अडकली होती. या हेलिकॉप्टरने ३५ कर्मचाºयांची सुटका केली आहे.
गुजरातच्या पिपावाव किनाºयापासून आग्नेयेस १५ ते २० सागरी मैलांवर असलेल्या सपोर्ट स्टेशन-3, ग्रेट शिप अदिती आणि ड्रिल शिप सागर भूषण या जहाजांसाठीही शोध व बचाव मोहीम सुरु आहे.
नौदलाचे आयएनएस तलवार हे जहाज या भागात पोहोचले आहे. नौदलाच्या पश्चिमी विभागानेमदतीसाठी पाच शक्तिशाली खेचून घेणाºया नौका पाठविल्या आहेत. ग्रेट शिप अदिती आणि सपोर्ट स्टेशन-3 यांना नांगर टाकण्यात यश आले आहे.
सागरभूषणच्या मदतीसाठी ‘समुद्रसेवक’ जहाज आणि किनाºयानजीकच्या भागात चील जहाज तैनात करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती आवाक्यात व स्थिर असल्याचे दिसते आहे.
चक्रीवादळामुळे समुद्र अद्यापही अत्यंत खवळलेला आहे. वाऱ्याचा वेग अंदाजे ३५ ते ५५ किलोमीटर प्रतितास आहे. मात्र, यामध्येही नौदलाची जहाजे आणि हेलिकॉप्टर्स काम करत आहेत
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App