विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूर दौऱ्यापासून रोखण्यासाठी त्यांना घरातच अडवून धरून ठाकरे- पवार सरकारने व्यक्ति आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. The hammer on Kirit Somaiya’s personal freedom, is he a terrorist? ; Praveen Darekar, Chandrakant Patil accused on police issue outside the house of somyya
सोमय्या हे काय दहशतवादी आहेत काय ? म्हणून त्यांच्या मुलुंड येथील घराबाहेर पोलिस ठेवलेले आहेत का ? , त्यांना घरात का अडकवून ठेवले, असा प्रश्न भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केला आहे.
भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या किरीटजी सोमय्या यांच्या निवासस्थानाबाहेर १०० पोलिसांनी वेढा दिला आहे.या सरकारच्या कार्यकाळात मुंबईत आतंकवादी उजळ माथ्याने फिरत आहेत, परंतु सत्ताबळ वापरून या सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे का ? pic.twitter.com/mgDSR410es — Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) September 19, 2021
भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या किरीटजी सोमय्या यांच्या निवासस्थानाबाहेर १०० पोलिसांनी वेढा दिला आहे.या सरकारच्या कार्यकाळात मुंबईत आतंकवादी उजळ माथ्याने फिरत आहेत, परंतु सत्ताबळ वापरून या सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे का ? pic.twitter.com/mgDSR410es
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) September 19, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यातील महाविकास आघाडीतील ग्रामविकास आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा आणखी गैरव्यवहार उघड करण्यासाठी भाजपचे किरीट सोमय्या आज कोल्हापूरला जाणार आहेत. पण, त्यांच्या दौऱ्यात अडथळे आणण्याचे प्रकार ठाकरे – पवार सरकारने सुरु केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App