विशेष प्रतिनिधी
बुलडाणा : जगप्रसिद्ध लोणार सरोवराची पाहणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली असून सरोवर आणि परिसर पाहून ते भारावून गेले. पर्यटन वृद्धीसाठी या परिसराचा विकास होण्याची गरज व्यक्त केली. The Governor was overwhelmed to see Lonar Lake; Expected development to boost tourism
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे उल्काघातानंतर या सरोवराची निर्मिती झाली आहे. भूगर्भशास्त्रज्ञाच्या दृष्टीने ते एक अभ्यासाचे ठिकाण असून पर्यटकांसाठी आवडते ठिकाण आहे.
लोणार सरोवर हा आमचा अमूल्य ठेवा आहे.या परिसराचा चांगला विकास झाल्यास हजारो नाही तर लाखोंच्या संख्येने देश विदेशातील पर्यटक येतील. त्यामुळे येथील आर्थिक स्थिती सुधारेल. लोणार सरोवराच्या विकासासाठी यशोचीत कार्य झाले पाहिजे अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली.
अ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून लोणार सरोवर ओळखले जाते. भूगर्भशास्त्रासह, खगोलीय अभ्यासासह जैविविधतेचा अभ्यास करण्यासाठी लोणार सरोवराचे वैज्ञानिक महत्त्व सर्वश्रृत आहे. बेसॉल्ट खडकात तयार झालेल्या खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर जगविख्यात आहे. जैविविधतेच्या दृष्टीनेही लोणार सरोवराचे महत्त्व आहे. महाराष्ट्रातील सर्वात छोटे पक्षी अभयारण्य म्हणूनही त्याचा उल्लेख केला जातो. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या लोणार संवाद सरोवराचा विकास झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App