शिवाजी महाराजांच्या विचारांवरच सरकारची दमदार वाटचाल; अजित पवार यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वंदन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करुन महाराष्ट्राला अभिमान, स्वाभिमान, राष्ट्राभिमान शिकवला. संकट कितीही मोठे असले तरी डगमगायचे नाही, हा विश्वास महाराष्ट्राच्या मातीत रुजवला. आजही महाराजांचे कार्य, त्यांचे विचार आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना अभिवादन केले. The government is working hard on the thoughts of Shivaji Maharaj; Statement by Ajit Pawar



पुण्यदिनानिमित्त अभिवादन करताना पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे राज्य, स्वराज्य स्थापन केले. संकट आणि शत्रू कितीही बलाढ्य असला तरी डगमगायचे नाही. जिद्द, बुद्धी, चातुर्य, संयमानं त्याला पराभूत करता येते हे महाराजांनी वारंवार सिद्ध केले. महाराजांचे हे कर्तृत्व व निर्माण केलेला राज्यकारभाराचा आदर्श प्रगत, पुरोगामी, शक्तिशाली महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्याला सदैव प्रेरणा देईल. महाराजांनी दिलेल्या विचारांवर राज्य सरकारची वाटचाल सुरु राहील.

The government is working hard on the thoughts of Shivaji Maharaj; Statement by Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात