आमचे सरकार ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. असंही म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई :‘कालच्या अध्यादेशमुळे मराठा समाजाला असलेला अधिकार सोप्या पद्धतीने त्यांच्यार्यंत पोहचवण्याचे काम झाले आहे. नोंदी असणार्या मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळणे कायदेशीरच होते. हे करत असताना ओबीसी समाजाला देखील 100 टक्के सुरक्षा दिली आहे.’ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.The golden mean that gives justice to every society Fadnavis statement on the Maratha reservation ordinance
तसेच, ‘यावर काही नेत्यांची व्यक्तीगत भूमिका वेगळी असू शकते. नेमके काय केले आहे हे त्यांच्या लक्षात आणून देण्यात येईल. मराठा समाजाला फायदा होत असताना कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, असा सुवर्णमध्य शासनाने काढला आहे. यामुळे कोणालाही चिंता करण्याचे कारण नाही. आमचे सरकार ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही.’ असंही यावेळी फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.
याचबरोबर ‘मागच्या काळात दिलेले मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले होते. परंतु काही कारणांमुळे सर्वोच्च न्यायालयाने ते आरक्षण फेटाळले. याच कारणांची मीमांसा करणारे सर्वेक्षण देखील आपण सुरू केले आहे.’ अशी माहितीही फडणवीसांनी दिली आहे.
मराठ्यांना सरसकट आरक्षण दिले जाणार नाही. तर ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांनाच आरक्षण मिळणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. तसेच, त्यांच्या रक्तातील नात्यातल्या लोकांना त्या आरक्षणाचा आणि नोंदींचा लाभ घेता येईल. मात्र, ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत, त्या मराठ्यांना आरक्षण दिले जाणार नसल्याचे फडणवीसांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App