सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे या गावी ४ जानेवारी २०२२ ला दुपारी १ वाजता बैलगाडी शर्यत होणार आहे.The first bullock cart race in Maharashtra will be held on January 4 in Sangli
विशेष प्रतिनिधी
सांगली : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर १६ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यात पहिलीच परवानगी सांगली जिल्ह्यात मिळाली आहे.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे या गावी ४ जानेवारी २०२२ ला दुपारी १ वाजता बैलगाडी शर्यत होणार आहे.या शर्यतीसाठी २६ नियम देण्यात आलेत. नियमांआधारेच ही स्पर्धा घेतली जाणार आहेसांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नियम पाळून बैलगाडी शर्यत भरवण्याचे दिले परवानगी पत्र दिले आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील बैलगाडा मालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
संदीप गिड्डे यांच्या पुढकारातून ही बैलगाडा शर्यत आयोजीत करण्यात आली आहे.सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यात पहिलीच परवानगी सांगली जिल्ह्यात मिळाली आहे. त्यामुळे मी जिल्हा प्रशासनाचे आभार मानत असल्याचे संदीप गिड्डे यांनी सांगितले.आम्ही सर्व कोरोनाचे नियम पाळून ही शर्यत घेणार आहोत.ही परवानगी दिल्यामुले प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि सुप्रीम कोर्टाचेही गिड्डे यांनी आभार मानले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App