महाराष्ट्रावर रूसलेला पाऊस आला; दहीहंडीचा उत्साह ओसंडून वाहिला; पहा फोटो फीचर!!

प्रतिनिधी

मुंबई : मुंबई ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले, तर मुंबईतील अन्य विधानसभा मतदारसंघांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दहीहंडीच्या उत्सवात सहभागी झाले. The enthusiasm of Dahi Handi overflowed

दहीहंडीच्या उत्साहात आज पावसाने भर घातली. गेले काही दिवस पाऊस महाराष्ट्रावर रुसला होता. पण जन्माष्टमीच्या निमित्ताने महाराष्ट्रात पुन्हा पाऊस आला आणि गोविंदांचा उत्साह ओसंडून वाहिला.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून स्थापन करण्यात आलेल्या टेंभीनाका मित्र मंडळाच्या दहीहंडी मित्र मंडळाने आयोजित केलेल्या दहीहंडी महोत्सवाला उपस्थित राहून गोविंदांशी संवाद साधला. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रित सिंह आणि अभिनेता वाशु भगनानी हेदेखील खास पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ठाणे शहरात दहीहंडीचा सण मोठ्या प्रमाणात साजरे करायची सुरुवात धर्मवीर आनंद दिघे यांनी केली. त्यांच्याच प्रेरणेतून राज्य सरकारने यंदा प्रथमच प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करून दहीहंडीच्या खेळाला प्रतिष्ठा मिळवून दिली. गोविंदा या खेळाला शासकीय खेळाचा दर्जा दिला. राज्यातील १ लाख गोविंदाना १० लाख रुपयांचा विमा काढला, दहीहंडीच्या सणाला शासकीय सुट्टी जाहीर केली तसेच या खेळात जखमी झालेल्या गोविंदाना ५ लाख, गंभीर जखमींना साडे सात लाख आणि मृत्यू झाल्यास १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

तसेच राज्यातील महायुती सरकारने विकासकामांचे थर उभे करून एक भक्कम मनोरा रचला आहे. मोदी द्वेषातून कितीही ‘इंडी’ आघाड्या झाल्या तरीही जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभी असून २०२४ ची दहीहंडी मोदीच फोडतील, असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला.

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, शिवसेना प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि हजारो गोविंदा उपस्थित होते.

ठाणे शहरातील बहुतेक सर्व दहीहंडी उत्सवांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली.

आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मागाठाणे विधानसभेतील देविपाडा मैदान, बोरीवली येथे शिवसेना व तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन द्वारा आयोजित भव्य दहीहंडी उत्सवात, तसेच
अशोक वन, दहिसर येथे भाजपा मुंबई प्रदेशचे उपाध्यक्ष प्रकाश दरेकर आणि शिवराज प्रतिष्ठान आयोजित भव्य दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले.

 

 

The enthusiasm of Dahi Handi overflowed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात