निवडणुकांची सुगी आली; राजकीय पक्षांची लढाई बापावर गेली

प्रतिनिधी

पुणे : निवडणुकांची सुगी आली आणि राजकीय पक्षांची लढाई बापावर गेली, असे म्हणायची वेळ आली आहे. कारण राजकीय पक्षांच्या नेत्यांची मजल एकमेकांचे बाप काढण्यावर गेली आहे.The election season has come and the battle of political parties has gone to father

अंधेरी विधानसभा पूर्व मतदार संघाची पोटनिवडणूक सुरू झाली आहे. दिवाळीनंतर 16 महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका केव्हाही जाहीर होतील. त्याचबरोबर सगळेच राजकीय पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या लढाईसाठी सज्ज होत आहेत. निवडणुकांचा असा राजकीय हंगाम सुरू होताना सर्वच राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर जोरदार घसरू लागले आहेत.


बावनकुळेंच्या मुख्यमंत्री पदाचा उल्लेख करून गडकरींचा “राजकीय बॉम्ब”; पण शिंदेंच्या खुर्चीखाली की फडणवीसांच्या??


बावनकुळे विरुद्ध रूपाली पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत घड्याळ बंद पाडायची वेळ आली आहे. भाजप प्रवेशाचे अजून अनेक बॉम्ब फुटणार आहेत. ते अजितदादा आणि जयंत पाटील यांना कळणारही नाही, अशी टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी बारामती घड्याळ बंद पाडणे ही काय कोणाच्या बापाची जहागिरी नाही. बारामतीत घड्याळ बंद पाडणे त्यांना एका जन्मात काय सात जन्म ते शक्य नाही, असे प्रत्युत्तर दिले आहे.

 प्रकाश आंबेडकरांचे शरसंधान

त्याच वेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील बापाचा उल्लेख करून आपण कोणाच्या पक्षाबरोबर जायचे हे आपणच ठरवणार आहोत, असे स्पष्ट केले आहे. वंचित बहुजन आघाडी भाजपला छुप्या पद्धतीने अनुकूल भूमिका घेते, अशी टीका होत असते. या टीकेला उत्तर देताना प्रकाश आंबेडकरांनी आमच्या पक्षाचा बाप आम्हीच आहोत. इतर कोणी आमचे बाप नाहीत. त्यामुळे उद्या भाजप सोबत जायचे ठरवले तर आम्हाला कोण रोखू शकतो? आणि कोणी रोखायचा प्रयत्न केला, तर त्याला झोपवून आम्ही भाजपबरोबर जाऊ शकतो, असे वक्तव्य केले आहे. पण त्याचवेळी आपण संघ आणि भाजपचे सर्वात प्रखर टीकाकार आहोत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. अशा पद्धतीने निवडणूक हंगामाची सुगी आली आणि राजकीय पक्षांची लढाई बापावर गेल्याचे दिसून येत आहे.

The election season has come and the battle of political parties has gone to father

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात