विशेष प्रतिनिधी
पुणे : पानशेत धरण परिसरात फिरायला गेलेल्या कुटुंबाची कार धरणात कोसळून पत्नीचा मृत्यू झाला.पती आणि मुलाला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले धरणाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून जात असताना कारचा टायर फुटल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही कार धरणामध्ये जाऊन कोसळली. ही घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास कुरण-वेल्हे रस्त्यावरील कादवे गावच्या हद्दीत घडली. The car crashed into the Panshet dam, woman died, husband and son saved by villagers
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी योगेश देशपांडे (वय 33, रा. शनिवार पेठ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती योगेश देशपांडे (वय 35) आणि मुलगा (वय नऊ) हे या अपघातातून बचावले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार पेठेत राहणारे हे कुटुंब रविवारी पानशेत धरण परिसरात पर्यटनासाठी गेले होते. कुरणगावच्या हद्दीतून पुढे आल्यानंतर ते एका हॉटेलवर थांबले. त्यानंतर त्यांची कार धरणाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून नेण्यास सुरुवात केली. पाऊस पडत असल्याने सर्वांनी कारमध्येच नाष्टा केला होता. दुपारी दोनच्या सुमारास कादवे गावाच्या दिशेने जात असताना कारचा टायर अचानक फुटला.
कार चालवित असलेल्या योगेश यांचे कारवरील नियंत्रण फुटले. ही कार काही क्षणात पाण्यामध्ये जाऊन कोसळली. कारमध्ये पाणी शिरल्याने कार बुडण्यास सुरुवात झाली. योगेश आणि त्यांच्या मुलाने कारच्या पुढच्या खिडकीमधून पाण्यात उडी घेतली. मात्र, कारच्या मागील दरवाजाची काच बंद असल्याने समृद्धी यांना कारमधून बाहेर पडता आले नाही.
मोठा आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. समृद्धी यांना पुढच्या खिडकीमधून बाहेर काढण्याचा ग्रामस्थांनी प्रयत्न केला. एका व्यक्तीने कारच्या मागील बाजूची खिडकीची काच फोडून त्यांना बाहेर काढले. सर्वांना तातडीने पानशेत येथील येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, समृद्धी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशपांडे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App