वीज बिल कमी करण्याचा शब्द ठाकरे सरकार पाळू शकले नाही, शर्मिला ठाकरे यांचा आरोप


कोरोना काळात सामान्य सर्व सामान्य माणूस सर्व बाजूंनी गांजला असता त्याला वीजेची भरमसाठ बिले पाठविण्यात आली आहेत. विज बिले कमी करण्याचा शब्द सुद्धा सरकार पाळू शकली नाही असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर केला. The Thackeray government could not keep its word to reduce the electricity bill, Sharmila Thackeray alleged


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोना काळात सामान्य सर्व सामान्य माणूस सर्व बाजूंनी गांजला असता त्याला वीजेची भरमसाठ बिले पाठविण्यात आली आहेत. वीज बिले कमी करण्याचा शब्द सुद्धा सरकार पाळू शकली नाही असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर केला. मनसेच्या डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेचे उद्घाटन  ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी त्या बोलत होत्या.त्या म्हणाल्या,  कोरोना लसीचे दोन डोस घेणा:यांना प्रवासाची मुभा दिली जाते. नागरीक लस घेण्यास तयार असताना त्याना दोन डोस उपलब्ध करुन देणे ही सरकारची जबाबदारी आहे. टी.बी., कॅन्सर आणि एड्ससाख्या आजारासह आपण जगतो. कोरोनाकाळात संपूर्ण जग बंद करुन कसे चालेल?



कॅनडा अमेरीकेतील लॉकडाऊन काळात तेथील नागरीकांच्या खात्यात पैसे जमा केले. आपल्या इथे नागरीकांच्या खात्यात पैसे टाका अशी मागणी करून शर्मिला ठाकरे म्हणाल्या, लोक विकतची लस घेण्यास तयार आहेत. त्यांना विकतची लस ही उपलब्ध करुन दिली जात नाही. जो टक्का लस विकत घेऊ शकत नाही. त्यांना मोफत लस दिली पाहिजे.

ज्यांची लस विकत घेण्याची कुवत आहे. त्यांना विकत द्यावी. आपल्या देशातून जगाला लस उपलब्ध करुन दिली जाते. मात्र आपल्या देशातील नागरीकांना लस मिळत नाही. त्याची व्यवस्था पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी करावी. लोकांकडून जीएसटी, इन्कम टॅक्स विविध कर वसूल केले जाते. हा पैसा जातो कुठे नागरिकांच्या कर रुपी पैशातून तरी लस विकत घेऊन ती नागरीकांना मोफत देण्यात यावी.

The Thackeray government could not keep its word to reduce the electricity bill, Sharmila Thackeray alleged

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात