नक्षलवाद्यांची दहशत झुगारून 16 वर्षांच्या प्रयत्नांनंतर छत्तीसगडमधील नक्षलबहुल गावांमध्ये शाळा सुरू


विशेष प्रतिनिधी

विजापूर (छत्तीसगड): नक्षलवाद्यांची दहशत झुगारून देत 16 वर्षांच्या प्रयत्नांनंतर, छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातील नक्षलबहुल गावांमध्ये शाळा उघडण्यात आल्या आहेत. विजापूरचे जिल्हाधिकारी रितेश अग्रवाल म्हणाले, गेल्या 15-16 वर्षांत नक्षलवाद्यांनी अनेक शाळा उद्ध्वस्त केल्या. 116 शाळा या वर्षी उघडल्या जातील, ज्यात 2,800 पेक्षा जास्त मुलांना फायदा होईल. पेड्डा जोजर, चिन्ना जोजर आणि विजापूर ब्लॉकमधील कामकनार गावे आता शिक्षण घेऊ शकतात. Schools open in Naxal-dominated villages in Chhattisgarh after 16 years of efforts

गटशिक्षण अधिकारी झाकीर खान म्हणाले, नक्षलग्रस्त आदिवासी भागातील गावकºयांशी संवाद साधणे सर्वात अवघड होते. परंतु, सरकारने त्यांना समजावले आहे. शिक्षणाचे महत्व त्यांना पटवून दिले आहे. त्यामुळे आता 14 शाळांमध्ये 900 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. या भागातील शाळा अत्यंत दुर्गम भागात आहेत. शिक्षकांना दररोज शाळेत जाण्यासाठी नदीतून यावे लागते. मात्र, तरीही शिक्षक या सर्व अडथळ्यांवर मात करून शाळेत येत आहेत. त्यांनी एकदाही वर्ग चुकविला नाही.

येथील विद्यार्थ्यांनाही आता शाळेची गोडी लागली आहे. एका विद्यार्थ्याने सांगितले की, पूर्वी आम्हाला आधी फक्त गोंडी भाषा कळत होती. पण आता आम्ही हिंदी बोलू शकतो. शिक्षक दररोज येत आहेत. शाळा प्रशासन आम्हाला पुस्तके आणि पोषाख पुरवित आहे.

२००४ मध्ये बस्तरमध्ये माओवाद्यांविरोधात सलवा जुडूमला सुरूवात झाली. त्यानंतर चिडून जाऊन नक्षलवाद्यांनी विजापूर, दंतेवाडा, सुकमा, नारायणपूरच्या अंतर्गत भागातील शाळांच्या इमारतींना लक्ष्य केले. या संघर्षादरम्यान, विजापूरमध्ये 300 हून अधिक शाळा उद्ध्वस्त झाल्या, असे खान यांनी सांगितले.

सुमारे ३० वर्षांनंतर 10 ऑगस्ट रोजी विजापूरच्या नक्षलबहुल तारेम गावाला वीज, स्वत:चे प्राथमिक आरोग्य केंद्र , एक शाळा आणि इतर नागरी सुविधांसह रस्ते मिळाले. राजधानी रायपूरपासून 500 किलोमीटर अंतरावर असलेल्या ताररेम गावातील रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले होते. हा प्रदेश 1980 नंतर नक्षली हिंसाचाराचा बळी ठरला. आता येथे प्राथमिक आरोग्य सेवा, अंगणवाडी केंद्रे, रेशन दुकान आणि रस्ते आहेत.नक्षलवाद्याच्या दहशतीमुळे अनेक ग्रामस्थांना त्यांच्या मूळ ठिकाणाहून स्थलांतर करावे लागले होते. मात्र, आता ग्रामस्थ आपल्या मुळ गावी परतत आहेत.

Schools open in Naxal-dominated villages in Chhattisgarh after 16 years of efforts

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात