Punelockdown news 2021 : पुण्याच्या ४०००० हजार दुकानदार – व्यापाऱ्यांमध्ये असंतोष; व्यापाराशी संबंधित २० लाख लोकांवर लॉकडाऊनचा दुष्परिणाम

वृत्तसंस्था

पुणे – महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने लागू केलेल्या कठोर निर्बंधांबाबत प्रचंड गोंधळ आहे. त्याच बरोबर पुण्यात ४० हजार व्यापारी – दुकानदार आहेत. त्यांच्यात प्रचंड असंतोष आहे. कारण व्यापाराशी संबंधित २० लाख लोकांवर या लॉकडाऊनचा दुष्परिणाम होणार आहे, असे फेडरेशन ऑफ ट्रेडर्स असोसिएशनच्या पुणे शाखेने म्हटले आहे. There’s a lot of confusion over new regulations being imposed by the Maharashtra govt. Only shops & restaurants will be closed.

राज्य सरकारने दुकाने आणि रेस्टॉरंट बंद ठेवण्याची घोषणा केली. पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळेच नियम लावून निर्बंध जाहीर केलेत. त्याचा परिणाम व्यापाऱ्यांना आणि त्यांच्याशी संबंधित लोकांना भोगायला लागतोय, असे फेडरेशन ऑफ ट्रेडर्स असोसिएशनच्या पुणे शाखेने म्हटले आहे. एएनआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे. 

दरम्यान, राज्यात सरकारने 15 दिवस १४४ कलम संचारबंदी लागू केली आहे. परंतु, अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवे अंतर्गत व्यवसायास परवानगी दिली. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून नेमके काय सुरु काय बंद हेच कळेनासे झाले आहे. कारण सरकारी ऑर्डर्स परस्पर विसंगत आहेत.

-व्यापारी न्यायालयात जाणार

त्यामध्ये सार्वजनिक वाहतूक, रस्त्याकडेला खाद्यपदार्थ विक्री, पेट्रोल, धान्य विक्री, बँका, उद्योग आदी ठिकाणी संचारबंदीचे कुठे पालन होणार आहे, अशी टीका पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केली. सरकारने खरे तर संपूर्ण लॉकडाऊन लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली. सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे ते म्हणाले.

There’s a lot of confusion over new regulations being imposed by the Maharashtra govt. Only shops & restaurants will be closed.