प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकालात राष्ट्रपती भवनाच्या मुघल गार्डनचे नामांतर अमृत उद्यानात करून केंद्रातील मोदी सरकारने देशाची राजधानी गुलामीच्या चिन्हांपासून टप्प्याटप्प्याने मुक्त करत असल्याचाच संदेश दिला आहे. The capital of the country is getting rid of the symbols of slavery
या आधी देखील मोदी सरकारने राजधानीतील गुलामीची चिन्हे मिटवून टाकली आहेत. ब्रिटिशांच्या काळातले राजपथाचे नामांतर कर्तव्य पथात केले आहे, इतकेच नाही तर ब्रिटिशांनी बांधलेल्या युद्धस्मारकामागे पंचम जॉर्जचा पुतळा मेघडंबरीत होता, तो तेथून हटवून त्याजागी देशगौरव नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
त्याचबरोबर देशातील हिंदू समाजावर अनन्वित अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाच्या नावाने असलेल्या मार्गाचे नामांतर भारताच्या विज्ञान प्रकल्पांचे पितामह डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने करून मोदी सरकारने औरंगजेबाच्या नावाचे गुलामीचे चिन्हही मिटवून टाकले आहे.
अलाहाबादचे नामांतर प्रयागराज असे करून अशी अनेक गुलामीची चिन्हे याआधी मिटवून टाकली आहेत आणि यापुढेही मिटवण्यात येतील, असाच संदेश केंद्रातील मोदी सरकारने दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App