प्रतिनिधी
सातारा : आमदार अपात्रतेबाबत निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना कालमर्यादा असते का याचा अभ्यास शिवसेनेने करावा. उद्धव ठाकरे हे केवळ नावाला मुख्यमंत्री होते. ते दोन तास मंत्रालयात गेले होते. त्यांना कायदे माहित नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या वरती आणखी काही असेल तर त्यांनी तिथेही जावे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्यांनी स्वतःच मूर्खपणा केला. आम्ही असा काही विचार करणार नाही असे स्पष्ट मत केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सातारा येथे जलमंदिर पॅलेस मध्ये पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.Thackeray’s Shiv Sena should go wherever it is above the Supreme Court, challenges Union Minister Narayan Rane
सातारा येथे भारतीय जनता पार्टीच्या महिला उद्योग शाखा व नक्षत्र उद्योग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योग विकास परिषद आयोजित केली होती. त्याला मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे व केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड हे आले होते. या परिषदेचे संयोजक म्हणून राज्यसभेचे सदस्य खासदार उदयनराजे भोसले होते. परिषद संपन्न झाल्यानंतर जलमंदिरला भेट देऊन तेथेच माध्यम प्रतिनिधींशी बोलताना नारायण राणे यांनी वरील मत व्यक्त केले.
मंगळसूत्र भाजपचे आणि हात पकडला शरद पवार यांचा
2024 पर्यंत आम्हाला वेळ असून तोपर्यंत काम करणार आहे. 2019च्या निवडणुकीपर्यंत भाजपबरोबर जे नांदत होते. मंगळसूत्र भाजपचे घातले होते. निवडणुकीला एकत्र लढले आणि निवडून आल्यानंतर खासदार शरद पवार यांचा हात पकडून गेले. नैतिकता नसलेल्या माणसाने नैतिकतेवर बोलू नये, अशी टीका ही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
संजय राऊत यांच्यावर टीका करताना नारायण राणे म्हणाले की, खासदार संजय राऊत यांचे एकही भाकीत खरे ठरत नाही. ते नैराश्यात गेले आहेत. मराठीत त्याला वेडसर म्हणतात. त्यांनी शिवसेनेला संपवले. राऊत स्वतः बेकार आहेत. शिवसेना 56 वरुन 13 वर आली आहे. त्यांचा अंत आला आहे अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या सातारा जिल्ह्याला आर्थिक समृद्ध करण्याची इच्छा खा. उदयनराजे भोसले यांची आहे. जिल्ह्यात उद्योग वाढावेत यासाठी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त उद्योग सुरू करावेत. सातारा जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न एक लाख 85 हजार आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रगत असला तरीही पश्चिम महाराष्ट्रात आर्थिक प्रगती दिसत नाही. तरुणांनी राजकारणाबरोबर उद्योगाकडे वळावे सातारा जिल्ह्याची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी उद्योग हे एकमेव क्षेत्र आहे. त्यात तरुण वर्गाने येऊन नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून उद्योग सुरू करावेत, यासाठी घेतलेली उद्योग परिषद अत्यंत स्तुत्य आहे, असे यावेळी नारायण राणे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App