सर्वोच्च न्यायालायच्या निकालानंतर नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात, म्हणाले…

Union Minister Narayan Rane Arrest Order by Nashik Police for derogatory comment On CM Uddhav Thackeray

उद्धव ठाकरेंचा आणि नैतिकतेचा संबध येतो कुठे? असा सवालही केला आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च  न्यायालयाच्या आजच्या अत्यंत महत्त्वाच्या निकालानंतर राज्यातील राजकीय अस्थिरता संपून शिंदे – फडणवीस सरकार स्थिर झाले आहे, इतकेच नाही तर आत्तापर्यंत घटनाबाह्य सरकारचा ठपका लावणाऱ्या उद्धव ठाकरेंना या निकालातून चपराकही बसली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच राजीनामा देऊन पवारांच्या सरकार घालवले हे देखील न्यायालयाच्या आदेशातूनच स्पष्ट झाले आहे. यावरून  आता विविध प्रतिक्रिया उमटत आहते. याच पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. Narayan Rane attacked Uddhav Thackeray after the Supreme Court verdict

नारायण राणे म्हणाले, ‘’सर्वोच्च  न्यायालयाच्या  निर्णायामुळे एकनाथ शिंदे  हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदावर राहणार हे निश्चित झालं आहे. म्हणून सरकारच्या बाजून निकाल  लागला  असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही.’’

याचबरोबर ‘’पण  या निर्णयामुळे बऱ्याच जणांना पोटशूळ  सुरू झाला आहे.  काल संध्याकाळपर्यंत विरोधकांकडून प्रतिक्रिया येत होत्या,  की १६ आमदार अपात्र ठरणार आणि शिंदे-फडणवीस सरकार जाणार. आम्ही परत सत्तेवर येणार. यामध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकेर, अनिल परब हे अशी विधानं करत होते. कसे येणार आपली संख्या किती आहे, हे सांगत नव्हते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने निर्णय दिला.’’ असं राणेंनी सांगितलं.

याशिवाय ‘’उद्धव ठाकरे पत्रकारपरिषदेत नैतकतेबद्दल बोलत होते. परंतु उद्धव ठाकरेंचा आणि नैतिकतेचा संबध येतो कुठे? नीतमत्ता, हिंदुत्व याला सोडचिठ्ठी देत नैतिकतेचा बोजवारा उडवणारे  उद्धव  ठाकरे आज नैतकतेवर बोलताय. राजीनामा  द्या म्हणताय पण आमच्या  विरोधात निकालच लागला नाही. नैतिकता, नीतीमत्ता आणि प्रामाणिकपणा या तीन शब्दांवर बोलण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना राहिलेला नाही.’’ अशा शब्दांमध्ये राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.

Narayan Rane attacked Uddhav Thackeray after the Supreme Court verdict

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात