नाशिक : राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर नेतृत्व करायची इच्छा महाराष्ट्राच्या जनतेने पुरती जिरवली. त्यामुळे ठाकरे + पवारांच्या पुढच्या पिढ्यांचे राजकारणात “लोकल लॉन्चिंग” करायची वेळ आली. शरद पवारांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे राष्ट्रीय पातळीवरून साखर कारखान्यांच्या निवडणुकांमध्ये “लॉन्चिंग” करायचा निर्णय घेतला. त्या पाठोपाठ महाविकास आघाडी तोडून उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरे यांच्या फायद्यासाठी मुंबई महापालिका निवडणुका स्वतंत्र लढायचा निर्णय घेतला. पण या दोन्ही निर्णयांमागे जनतेने ठाकरे आणि पवारांची राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरचे नेतृत्व करण्याची इच्छा पूर्ण जिरवून टाकली, हेच कारण ठरले.
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मुंबई सह सर्व महापालिका निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढवेल अशी घोषणा केली त्यानिमित्ताने शिवसैनिकांना अपेक्षा नुसार निवडणुका लढवायची संधी मिळेल आणि आपली ताकद आजमावता येईल, असे संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त केल्या, महाविकास आघाडी तुटल्याने नुकसान तर होणार आहेच, पण ठाकरेंना स्वतंत्रच लढायचे असेल, तर आमचा नाईलाज आहे. अशी हतबलता देखील व्यक्त केली.
आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी तोडली, असा आरोप करणारे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले. यातून प्रकाश आंबेडकरांनी सूचकपणे आदित्य ठाकरे यांची विरोधी पक्षनेते पदाचीवरची निवड, त्यासाठी भाजपची पूर्वअट आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई महापालिका निवडणुकीची सूत्रे सोपविण्याचा उद्धव ठाकरे यांचा इरादा यावर “प्रकाश” टाकला.
दुसरीकडे शरद पवारांनी खासदार सुप्रिया सुळे यांना आता माळेगाव आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांमध्ये लक्ष घालायला सांगितले एरवी कुठलाही नेता स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत असा चढत्या भाजणीने राजकीय प्रवास करत असतो. परंतु सुप्रिया सुळेंचा राजकीय प्रवास मात्र “रिव्हर्स स्विंग” टाकून उलट्या दिशेने सुरू करायला लावला.
सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. त्यामुळे त्या संसदेत काम करतात. अजित पवारांना राज्याच्या राजकारणात रस आहे म्हणून ते राज्यात काम करतात, असा तर्क गेली अनेक वर्ष शरद पवार लावत होते, पण राष्ट्रवादी फुटल्यानंतर मात्र पवारांना सुप्रिया सुळेंसाठी “रिव्हर्स स्विंग” टाकून राष्ट्रीय पातळीवरून थेट साखर कारखान्याच्या लोकल राजकारणात लॉन्च करावे लागले.
दोनच महिन्यांपूर्वी ठाकरे आणि पवारांच्या या वारसदारांची नावे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी घेतली जात होती. ठाकरे आणि पवारनिष्ठ मराठी माध्यमे दोघांच्याही नेतृत्व गुणांची वर्णने भरभरून करत होती. पवारांना तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा होती, पण प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या जनतेने “मुख्य ठाकरे” आणि “मुख्य पवार” यांचीच सत्तेची इच्छा जिरवून टाकली. त्यामुळे त्यांच्या पुढच्या पिढीला विचारायचे कारणच उरले नाही. पण म्हणून राजकारण थांबवून चालणार नाही. ते कसेबसे तरंगत ठेवावे लागेल, हे लक्षात येताच ठाकरे आणि पवार आपल्या पुढच्या पिढीचे “लोकल लॉन्चिंग” करण्याच्या मन:स्थिती पर्यंत येऊन ठेपले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App