महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत मोदींवरच्या टीकेचा पुढचा अध्याय सादर; पण जागावाटप + मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नांना बगल!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीच्या आजच्या पत्रकार परिषदेत मोदींवरच्या टीकेचा पुढचा अध्याय सादर झाला, पण आघाडीचे जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नांना बगल देऊन आघाडीच्या नेत्यांनी आजची पत्रकार परिषद “साजरी” केली. Thackeray and pawar avoided questions regarding MVA seats distribution and chief ministerial candidate

लोकसभा निवडणुकीमध्ये चांगला परफॉर्मन्स झाल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार चांगल्या मूडमध्ये होते. परंतु काँग्रेस नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे नाराज असल्याने ते यशवंतराव चव्हाण सेंटर मधल्या पत्रकार परिषदेला आलेच नाहीत. त्यांच्या ऐवजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले.

शरद पवार अध्यक्ष असलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटर मधल्या पत्रकार परिषदेत पवारांपेक्षा उद्धव ठाकरेच पत्रकार परिषदेचे “मुख्य आकर्षण” ठरले. पत्रकारांनी जास्तीत जास्त प्रश्न उद्धव ठाकरे यांनाच विचारले. शेवटी आता पवार साहेब उत्तरे देतील. त्यांना काही प्रश्न विचारा असे उद्धव ठाकरेंना पत्रकारांना सांगावे लागले त्यानंतर पवारांच्या दिशेने पत्रकारांच्या प्रश्नाचा रोख वळला.

पवार आणि उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोदींवरच्या टीकेचा पुढचा अध्याय पत्रकार परिषदेत सादर केला. मोदींनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त सभा घ्याव्यात म्हणजे महाविकास आघाडीला त्याचा लाभ होईल, असा टोमणा पवारांनी मारला. मोदींच्या सभांचे ट्रॅक रेकॉर्ड पवारांनी सांगून जिथे मोदी गेले तिथे भाजप उमेदवार हरले, असा दावा केला. फेक नॅरेटिव्ह संदर्भात मोदींनी मांडलेले तुमच्या दोन म्हशींपैकी एक म्हैस उचलून नेतील हे नॅरेटिव्ह खरे होते का??, असा सवाल त्यांनी केला. त्याचबरोबर जिथे रामाची पावले पडली, तिथे भाजप हरली असे सांगून महाविकास आघाडीने भाजप मुक्त राम केला, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

या सगळ्या पत्रकार परिषदेत आणि त्याआधीच्या बैठकीत महाविकास आघाडीचे जागावाटप, महाविकासाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा या विषयावर चर्चा झाली की नाही??, यावर मात्र सुरुवातीला सर्वच नेत्यांनी मौन बाळगले. ज्यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्रीपदासाठी जागा वाटपाचा प्रश्न विचारला, त्यावेळी अजून महायुतीचे जागावाटप कुठे झाले आहे?? त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण??, वगैरे प्रतिप्रश्न उद्धव ठाकरेंनी पत्रकारांनाच विचारले.

पण या सगळ्या पत्रकार परिषदेतून मूळात महाविकासाकडे जागावाटप झाले का त्यांच्यात लहान भाऊ कोण??, मोठा भाऊ कोण हे ठरले का??, या सवालांचे त्यांनी उत्तर दिले नाही. आमच्यात लहान भाऊ – मोठा भाऊ असे काहीही नाही, असे एका वाक्यातले उत्तर फक्त पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. त्यांना ठाकरे – पवारांनी दुजोरा दिला, पण नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यासारखे काँग्रेसचे सध्या अधिकार असलेले नेते पत्रकार परिषदेला नव्हते, त्याविषयी ठाकरे पवारांनी भाष्य करणे टाळले. त्याचबरोबर शरद पवारांना शिखर बँक घोटाळे संदर्भातल्या प्रश्न विचारल्यानंतर तो न्याय प्रविष्ट विषय असल्याचे सांगून पवारांनी सविस्तर बोलणे टाळले, कारण त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या शेजारी बसले होते.

Thackeray and pawar avoided questions regarding MVA seats distribution and chief ministerial candidate

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात