विशेष प्रतिनिधी
मुंबई – राज्याच्या मोटार वाहन कर अधिनियमांतर्गत राज्य सरकारने इलेक्ट्रिक बॅटरीवरील वाहनांना करात २०२५ पर्यंत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. दहा लाख रुपये किमतीच्या आत असलेल्या अपंगांसाठीच्या वाहनांना १०० टक्के, तर त्याहून जास्त किंमत असलेल्या वाहनांना करात ५० ते ७५ टक्के सूट देण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाने सांगितले. Tax benefit on Battery operated vehicles
राज्यात विक्री व नोंदणी झालेल्या वाहनांना ही सवलत मिळणार आहे. यात दुचाकी, चारचाकी आणि यांत्रिकी पद्धतीने चालणारे रोड रोलर, अग्निशमन प्रयोजनासाठीची वाहने, तात्पुरती नोंदणी केलेली सर्व वाहने, शेती कामासाठी वापरणारे ट्रेलर, तर बॅटरीवर चालणाऱ्या सर्व वाहनांना करातून १०० टक्के सूट देण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App