विशेष प्रतिनिधी
मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा लोकसभा निवडणुकीतला परफॉर्मन्स घसरला त्यावर भाजपच्या काही नेत्यांनी अंतर्गत बैठकीत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यानंतर अजित पवारांचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी भाजपला दमबाजी केली, पण या दमबाजी मुळे भाजपचे नेते ऐकण्याऐवजी मिटकरींनाच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी सुनावले पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या परवानगीशिवाय महायुतीतल्या पक्षांचा संदर्भात काही बोलू नये, अशी ताकीद तटकरेंना दिल्याचे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. tatkare warns to Mitkari not to talk about mahayuti
अजित पवार गटावर खापर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंग्रजी मुखपत्र द ऑर्गनायझरने पहिल्यांदा अजित पवार गटावर तोफ डागली. निकालानंतर लागलीच भाजपला आरसा दाखविण्यात आला. अजित पवार गटाला सोबत घेतल्यानेच महाराष्ट्रात भाजपला पराभवाचे तोंड पाहायला लागल्याचा आरोप करण्यात आला. भाजपने त्यांना सोबत घेऊन किंमत कमी केल्याचे म्हटल्या गेले. आता विधानसभेपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे डॅमेज कंट्रोलची जबाबदारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीकडूनही हल्लाबोल
महायुतीत आम्ही ज्या विकासाच्या मुद्यावर लोकांची कामं करण्यासाठी म्हणून गेलो. संघाच्या बैठकीत जी काही चर्चा ती त्यांची अंतर्गत आहे. मात्र अजितदादांना घेऊन त्यांचं काही नुकसान झालं नाही. पण भाजपवरची जी काही नाराजी आहे त्याचा फटका अजित पवारांना बसला हे म्हणणं योग्य असल्याचा टोला रुपाली पाटील यांनी काल हाणला.
संघाच्या मुखपत्रात कोणीतरी लेख लिहला. त्यानंतर सातत्याने अजित पवारांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न राज्यात सुरु झाला आहे. भाजपच्या एका बैठकीत सुद्धा काही नेत्यांनी भाजपच्या पराभवाचे खापर अजित पवारांवर फोडलं आहे. जर अशाप्रकारे अजितदादांना जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असेल तर आम्हाला निश्चित वेगळा विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना दिली.
सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया
तर या सर्व वादावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीतील पक्षांबाबत बोलताना पक्षाध्यक्षांची परवानगी घ्यावी, अशी सक्त ताकीद अमोल मिटकरी यांना दिल्याचे तटकरे म्हणाले. राजकीय भाष्य करण्यापूर्वी मिटकरी यांनी परवानगी घेण्याची ताकीद त्यांना देण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी स्पष्ट केले. काही मंडळी महायुतीत बेबनाव असल्याचा मुद्दामहून प्रचार करत असल्याचा आरोपही तटकरे यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App