नाशिक : अजितदादांच्या राष्ट्रवादीची परफॉर्मन्स मध्ये वजाबाकी, पण नेत्यांची नाराजी आणि भाजपला दमदाटी, अशी खरंच त्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था आहे!! अजितदादांच्या राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स लोकसभा निवडणुकीत ढिल्ला ठरला. ते सुनेत्रा पवारांना देखील बारामतीतून निवडून आणू शकले नाहीत. तरीपण महायुतीतल्या भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घेण्यासाठी मुकसंमती दिली. त्यातून अजित पवार खरे लाभार्थी ठरले. कारण पवारांच्या घरातले 3 खासदार झाले. Ajit pawar’s NCP had dismal performance in loksabha elections, but they ar threatening BJP
एवढे असूनही गेल्या तीन-चार दिवसांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून मात्र नाराजीचे सूर उमटले. किंबहुना भाजपने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जेव्हा पराभवाची चिकित्सा केली, त्यावेळी आकडेवारी सह अजितदादांच्या परफॉर्मन्सचा पर्दाफाश झाला. मावळ, माढा, सोलापूर, शिरूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवारांचे समर्थक आमदार असूनही तुमच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना पीछेहाट सहन करावी लागली. हे आकडेवारीने सिद्ध झाले. त्यावर भाजपच्या काही नेत्यांनी पक्षांतर बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केली त्यांनी प्रसार माध्यमांकडे जाऊन नाराजी व्यक्त केली नाही संघाच्या “ऑर्गनायझर” नियतकालिकातून भाजपला कानपिचक्या देण्यात आल्या.
पण भाजप आणि संघाने केलेली ही चिकित्सा अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या जिव्हारी झोंबली. राष्ट्रवादीच्या ढिल्ल्या परफॉर्मन्सचे हे सत्य त्यांना पचले नाही. त्यामुळे हसन मुश्रीफ, रूपाली पाटील, अमोल मिटकरी हे अजितदादांचे समर्थक बाहेर येऊन भाजपवरच दुगाण्या झोडू लागले. त्यांना जितेंद्र आव्हाड येऊन मिळाले.
तेवढ्यात छगन भुजबळांच्या नाराजीची बातमी समोर आली. छगन भुजबळ यांना वयाच्या 75 नंतर देखील नाशिकमधून लोकसभा लढवायची होती. केवळ राज्यातल्या मंत्रिपदावर त्यांचे समाधान होत नव्हते. परंतु, लोकसभेचे तिकीट ते खेचून आणू शकले नाहीत. मात्र नाशिक मधल्या महायुतीच्या उमेदवाराच्या पराभवात त्यांचा “हात” राहिला. इतकेच काय, पण दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या येवला विधानसभा मतदारसंघात देखील छगन भुजबळ महायुतीच्या उमेदवारांना लीड देऊ शकले नाहीत. भुजबळांचा लोकसभा निवडणुकीतला परफॉर्मन्स देखील ढिल्लाच ठरला.
तरी देखील त्यांच्या नाराजीच्या बातम्या वाढल्या. अजित पवारांनी सुनेत्रा पवारांचा पराभव होऊन देखील त्यांना राज्यसभेची संधी दिली, पण आपल्याला राज्यसभेवर डावलले अशी त्यांची भावना तयार झाल्याचे बोलले गेले. छगन भुजबळ गेले कित्येक वर्षे सत्तेवर आहेत. महाराष्ट्रात मंत्री पदावर आहेत, पण त्यांची महत्त्वाकांक्षा शमली नाही. समता परिषदेमार्फत त्यांनी स्वतःलाच वेगळे काही करण्याचा सल्ला देऊन घेतल्याचे बोलले गेले. दोन दिवस नाराजीच्या बातम्या चालल्यानंतर छगन भुजबळ यांनी आपण नाराज नसल्याचे वेगवेगळ्या पद्धतीने खुलासे केले. पण तोपर्यंत महायुतीच्या बाबतीत जे डॅमेज व्हायचे होते, ते होऊन गेले.
अजितदादांच्या राष्ट्रवादीला महायुतीत मोठा लाभ मिळाला. त्यांचे 9 मंत्री झाले. सुनेत्रा पवारांचा पराभव होऊन देखील त्या राज्यसभेत खासदार झाल्या, पण महाराष्ट्रातल्या महायुतीच्या पराभवाची चिकित्सा राष्ट्रवादीच्या नेत्यांना सहन झाली नाही. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते भाजप वरच जाहीरपणे उलटले. भाजपलाच वेगळा विचार करण्याची दमदाटी करू लागले. आता भाजप अजितदादांच्या बाबतीत नेमका काय निर्णय घेणार??, त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोणत्या भाषेत “समजावून” सांगणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App