टाटा उद्योग सुमूह आणि कल्याणी समुहाने भारतीय लष्करासाठी अत्याधूनिक चिलखती वाहने बनवली आहे. शत्रुचा गोळीबार, बॉम्बवर्षावात ही वाहने थेट युद्धभूमित सैन्याला सुरक्षित ठेवणार आहे. Tata industries company and Bharat forge company make new technology vehicals for army, in the presence of Army chief this vehicals handover to Indian Army
विशेष प्रतिनिधी
पुणे : आत्मनिर्भर भारत अंतर्गत अनेक स्वदेशी कंपन्यांना आता शस्त्रास्त्र निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले आहेत. भारतीय कंपन्याही आंतराष्ट्रीय दर्जाचे शस्त्रास्त्र निर्मिती करत आहेत. टाटा उद्योग सुमूह आणि कल्याणी समुहाने भारतीय लष्करासाठी अत्याधूनिक चिलखती वाहने बनवली आहे. शत्रुचा गोळीबार, बॉम्बवर्षावात ही वाहने थेट युद्धभूमित सैन्याला सुरक्षित ठेवणार आहे.लष्करप्रमुख जनरल मनोज नरवने आणि उपलष्करप्रमुख मनोज पांडे यांच्या उपस्थितीत पुण्यात ही वाहने लष्करात दाखल करण्यात आली.
बॉम्बे सॅपर्स ग्रुपमध्ये एका कार्यक्रमात ही वाहने लष्कराला सुपूर्द करण्यात आली. युद्ध भूमित सैन्याला सुरक्षित ठेवणे हे महत्वाचे आहे. त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी काही खास चिलखती वाहने वापरली जातात. या पूर्वी रशियन किंवा इतर देशांनी निर्मित केलेली चिलखती वाहने भारतीय लष्कर वापरत होते. मात्र, आता भारतीय कंपन्यांनी ही उच्च दर्जाची सुरक्षा सैन्याला पुरवणारी वाहने बनवली आहेत. टाटा उद्योग समुहातर्फे लडाख सारख्या अतिउंचावरील क्षेत्रात सैन्याला वेगाने पोहचवण्यासाठी इन्फन्ट्री प्रोटेक्टेड मोबिलिटी व्हेहिकल्स (आयपीएमव्हीएल) ही चिलखती वाहने तयार केली आहे. हे चिलखती वाहने संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) यांच्या मदतीने बनविण्यात आली आहे. पुण्यातील कारखान्यातच याची निर्मिती करण्यात आली आहे.
या वाहनाचे प्रारुप आणि आखणी भारतातच करण्यात आली आहे. भारतीय सैन्याने वाळवंटात तसेच अतिउंचावरील भागात याच्या चाचण्या घेतल्या असून प्रत्येक चाचण्यात हे वाहन यशस्वी ठरले आहे. या चिलखती वाहनात डीआरडीओच्या डिफेन्स मेटॅलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरीने विकसित केलेले एक्स्टर्नल अॅड-आॅन आर्मर प्रोटेक्शन पॅनेल्स आणि थर्मल साईट्ससह रिमोट कंट्रोल्ड वेपन सिस्टीमचा देखील समावेश आहे. शत्रुची भूसुरंगे तसेच हायक्वालीटीचे शस्त्रसुद्धा या वाहनांना भेदू शकत नाही. त्यामुळे थेट युद्धभूमित भारतीय सैन्याला या वाहनांमुळे आघाडी मिळणार आहे. या चिलखती वाहनांचे १२ युनिट लष्कराला देण्यात आले आहे. लष्कराच्या मागणीनुसार त्यानुसार वाहनांची बांधणी केली जाणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App