रुबी हॉल क्‍लिनिकचा अवयव प्रत्यारोपण परवाना निलंबित – किडनी तस्करीप्रकरणी अंतिम चौकशी अहवाल येईपर्यंत आदेश


रुबी हॉल क्‍लिनिकचा अवयव प्रत्यारोपणाचा परवाना किडनी तस्करी प्रकरणाचा अंतीम अहवाल येईपर्यंत निलंबित करण्यात आला आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे – रुबी हॉल क्‍लिनिकचा अवयव प्रत्यारोपणाचा परवाना किडनी तस्करी प्रकरणाचा अंतीम अहवाल येईपर्यंत निलंबित करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य खात्याने हे आदेश काढले आहेत. Ruby hall clinic human organ transplant surgery licence suspended by Maharashtra health department

एका महिलेला 15 लाख रुपयांचे अमिष दाखवून, ती रुग्णाची नातेवाईक असल्याचे दर्शवणारे बनावट कागदपत्रे बनवून तिच्या किडनीची तस्करी केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात त्या महिलेने तक्रार दाखल केली आहे.



या प्रकरणी राज्य आरोग्य विभागाने रुबी हॉल क्‍लिनकला कारणे दाखवा नोटीस पाठवून “अवयव प्रत्यारोपणाचा परवाना रद्द का करू नये’ अशी विचारणा केली होती. त्याला 24 तासांत उत्तर देण्याचे आदेशात म्हटले होते. त्यानुसार रुबी हॉल क्‍लिनिकने त्याला उत्तर दिले. याशिवाय या प्रकरणावर राज्य सरकारने “महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील’ सदस्यांची चौकशी समिती नेमली आहे.

त्या समितीचे चौकशीचे काम सुरू असून, ससूनमधील अवयव प्रत्यारोपण पडताळणी समितीतील सदस्यांचीही त्यांनी चौकशी केली असून, रुबी हॉल क्‍लिनिकमधील संबंधितांची चौकशी केली आहे. त्यांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे, हा अहवाल येईपर्यंत त्यांची अवयव प्रत्यारोपणाची मान्यता काढून घेण्यात आली आहे.

Ruby hall clinic human organ transplant surgery licence suspended by Maharashtra health department

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात