विजेच्या तारेला हात लागल्याने चालकाचा मृत्यू


तमाशा कलावंत कलाकरांच्या वाहनांचा चालक असलेल्या एकाचा विजेच्या वायरीला हात लागल्याने विजेच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे – तमाशा कलावंत कलाकरांच्या वाहनांचा चालक असलेल्या एकाचा विजेच्या वायरीला हात लागल्याने विजेच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात कोरेगांवमुळ येथे घडली आहे. Tamasha artist bus driver dead due to shock of power supply wire

जितेंद्र राधीकाप्रसाद पांडे (वय ३२, सध्या रा. ईश्वरनगर, वाशी बेलापूर रोड, ठाणे वेस्ट, मुंबई. मुळ रा. रामवापूर, ता. सिद्धार्थनगर, झकौहर बजार, उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. कोरेगांवमुळ गावचे ग्रामदैवताचे वार्षिक उत्सवासाठी किरणकुमार ढवळीपुरकर यांच्या लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या तमाशातील कलाकारांना गावोगावी पोहचवण्यासाठी मुंबई येथील आश्विनी ट्रॅव्हल्सची लक्झरी बस भाडेतत्वावर ठरविण्यात आली होती. या लक्झरीवर जितेंद्र हे चालक म्हणून कार्यरत होते.

९ एप्रिल रोजी टाकळी ढाकेश्वर (ता. पारनेर,अहमदनगर) येथील कार्यक्रम करून सर्व कलाकार लक्झरीने कोरेगावमुळ येथे पोहोचले होते. लक्झरी ग्रामपंचायत कार्यालयानजीकच्या मोकळ्या मैदानात उभी करण्यात आली होती. गाडीवरून गावाला विद्युतपुरवठा करणा-या विद्युतभारीत तारा गेल्या होत्या. मध्यरात्री १.५५ वाजण्याच्या सुमारांस तमाशाचा कार्यक्रम झाल्यावर जितेंद्र समवेत तमाशा व्यवस्थापक किरण गायकवाड, सुदेश शिमाणे, दिपक ससाणे व इतर कलाकार लक्झरीवर झोपण्यासाठी बसजवळ आले. सर्वजण गप्पा मारत थांबले होते.

त्यावेळी जितेंद्र हे लक्झरीचे मागील बाजूस असलेल्या लोखंडी शिडीच्या सहाय्याने वर गेले. मात्र, अंधारामुळे त्यांना गाडीवरील विद्यूत वाहक तार दिसली नाही. तारेला त्यांचा हात लागल्याने त्यांचा शॉक लागून ते खाली पडले. उपचारासाठी त्यांना उरूळी कांचन येथील सिद्धिविनायक रूग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Tamasha artist bus driver dead due to shock of power supply wire

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात