सोमय्या पिता – पुत्रांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; प्रवीण दरेकरांना मात्र हायकोर्टाचा दिलासा!!


प्रतिनिधी

मुंबई : आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांचे अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी कोर्टाने फेटाळले. मात्र मंगळवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने मंजूर केला आहे. त्यामुळे बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकरांना मोठा दिलासा मिळाल्याचे समोर आले आहे. पण त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.Somaiya’s father-son’s pre-arrest bail rejected

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस किरीट सोमय्या यांच्या घरी पोहोचले. पण किरीट सोमय्या त्यावेळी घरी नव्हते. त्यामुळे पोलिसांनी किरीट सोमय्या यांच्या घरावर उद्या हजर राहण्याची नोटीस चिकटवली आहे. किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमैया याचा अटकपूर्व जामीन अर्ज देखील कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे त्याच्या अटकेची शक्यता आहे.



 

– हायकोर्टाकडून मोठा दिलासा

बोगस मजूर प्रकरणी सध्या प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. इतकी वर्ष झाली तरी या प्रकरणाचा तपास सुरू आहे? त्यामुळे कस्टडीची गरज नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यापूर्वी सत्र न्यायालयानेह दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. यानंतर त्यांना हायकोर्टाने दिलासा दिला असून त्यांना ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दरेकरांची दोन वेळा चौकशी केली होती. दरेकरांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असून सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याची आमची तयारी असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे. तर, सरकार तोंडघशी पडणार असल्याचा दावा दरेकर यांच्या वकिलांनी केला होता. सुनावणीनंतर हायकोर्टाने दरेकरांना दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

– दरेकरांचे प्रकरण जुनेच

प्रवीण दरेकर यांची मुंबै बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. परंतु सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले. आम आदमी पार्टीचे धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सुमारे २० वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे. या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली.

प्रवीण दरेकर १९९७ पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. पण मजूर नसतानाही निवडणूक लढवून प्रवीण दरेकर यांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. मुंबै बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाला असून सहकार कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे.

Somaiya’s father-son’s pre-arrest bail rejected

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात