विशेष प्रतिनिधी
मुंबई : समित कदमांचे नाव घेत अनिल देशमुखांनी केला वार, त्यावर स्वतः कदमांनीच केला पलटवार; पण देवेंद्र फडणवीस यांनी देशमुखांना पुन्हा दिले आव्हान!!, असा आजचा घटनाक्रम राहिला. Taking the name of Samit Kadam, Deshmukh attacked
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक गौप्यस्फोट केले. आपण गृहमंत्री असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी ऑफर दिली होती, असा दावा अनिल देशमुखांनी केला आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी एका व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला ही ऑफर दिली होती. समित कदम हा देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन आला होता, असा नवा आरोप केला. अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्यानुसार जी व्यक्ती देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन गेली होती, त्याचं नाव समित कदम आहे. समित कदम हे जनस्वराज्य पक्षाचे युवा प्रदेश अध्यक्ष आहेत. या समित कदम यांनी अनिल देशमुखांच्या आरोपांवर पलटवार केला.
समित कदम म्हणाले :
अनिल देशमुख हे त्यावेळी राज्याचे गृहमंत्री होते. त्यांना झेड प्लस सुरक्षा होती. त्यांनी मी त्यांच्या घरी गेलो होतो याचा खुलासा केला आहे. त्यांच्या परवानगीशिवाय मी त्यांच्या घरी जाऊ शकत नाही. त्यांनीच मला बोलावले होते म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांना माझ्या अडचणीत मदत करण्यासाठी त्यांनी विनंती केली होती. त्यामुळे देवेंद्र फडवणीस यांचा आमच्या भेटीशी कुठलाही दूरान्वयही संबंध नाही. अनिल देशमुखांनी घरी बोलावले म्हणून मी गेलो होतो. त्यामुळे त्यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी तीन वर्षानंतर हा विषय काढणे मला गरजेचा वाटत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे माझ्या भेटीचे काही फुटेज असतील तर त्यात काय विशेष नाही. मी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी सर्वा मंत्र्यांकडे भेटायला जात असतो.
अनिल देशमुख यांचे आरोप
ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऑफर होती. मला ऑफर देऊन उद्धव ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांना अडकवण्याचा डाव होता. आरोप करण्यासाठी 4 प्रतिज्ञापत्रांवर सही करण्यासाठी मला सांगितले होते. देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन मिरजेतील समित कदम हा मला भेटायला आला होता. समित कदम जनसुराज्य शक्ती पक्षाच्या युवा शाखेचा अध्यक्ष आहे. आरोपांचा मसुदा असलेला लिफाफा समितने आणला होता. समितने 5 ते 6 वेळा माझी भेट घेतली. माझ्याकडे भेटीचे व्हिडीओ आहेत.
देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर
अनिल देशमुख खोटे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते दावा करत असलेले पुरावे देशमुखांना देऊ द्या. त्यांच्या पुराव्यानंतर माझ्याकडे असलेल्या सर्व क्लिप्स सार्वजनिक करीन, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App