सबुरीनं घ्या नाहीतर गाडी फोडू!!; संभाजी राजेंच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्याची भुजबळांना धमकी

प्रतिनिधी

पुणे : मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण हा वाद पेटला असताना मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ एकमेकांविरुद्ध अधिक आक्रमक भाषा वापरत असताना संभाजी राजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या वादात उडी घेऊन भुजबळांना धमकी दिली आहे. Swarajya organisation of sambhaji raje threatened chagan bhujbal to destroy his car on the issue of maratha reservation

पुण्याच्या शासकीय विश्रामगृहात घुसून स्वराज्य संघटनेचा कार्यकर्ता धनंजय जाधव यांनी भुजबळांना सबुरीनं घ्या, नाहीतर तुमची गाडी इथेच फोडू, अशी धमकी दिली आहे. या धमकीनंतर नाशिकचे माजी खासदार आणि भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ तातडीने छगन भुजबळांच्या भेटीसाठी शासकीय विश्रामगृहावर दाखल झाले.

मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण या वादात मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांना प्रकाश आंबेडकरांनी संयम राखण्याचा सल्ला दिला होता, पण हा सल्ला जरांगे पाटलांनी आणि भुजबळांनी धाब्यावर बसवला आणि एकमेकांविरुद्ध आक्रमक भाषा वापरणे चालूच ठेवले.


बीडच्या सभेत छगन भुजबळ फुटले; शरद पवारांवर धुवाँधार बरसले!!


कालच्या ओबीसी एल्गार परिषदेत छगन भुजबळ यांनी मराठा समाज मागास नाही. त्यांना मागास ठरवण्यासाठी सरकारने नेमलेली शिंदे समितीस रद्द करावी अशी मागणी केली. मराठा समाज वेगवेगळ्या आरक्षणांमधून कसा लाभार्थी आहे याची आकडेवारी निश्चित माहिती दिली. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे. कुणबी प्रमाणपत्राचे वाटप स्थगित करावे आणि गेल्या दोन महिन्यांत दिलेली कोणती प्रमाणपत्रे देखील मागे घ्यावीत, अशी मागणी केली. त्यामुळे मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटली.

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण ही लढाई मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ या दोन नेत्यांमध्ये वैयक्तिक असल्यासारखी लढली जाऊ लागली. जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्या भोवती दोन समाजांचे राजकीय ध्रुवीकरण झाले. त्यामुळे संभाजी राजेंच्या स्वराज्य संघटनेत अस्वस्थता पसरली. मराठा आरक्षणासाठी आपणही आक्रमक आहोत असे दाखवत स्वराज्य संघटनेचे पुण्यातले कार्यकर्ते धनंजय जाधव पुण्याच्या शासकीय विश्रामगृहात घुसले आणि त्यांनी भुजबळांना गाडी फोडण्याची धमकी दिली.

यानंतर आता ओबीसी समाजही आक्रमक झाला असून भुजबळांना कोणत्याही प्रकारचा धक्का लागला, तर आम्ही गप्प बसणार नाही, अशी उलटी धमकी ओबीसी समाजातल्या कार्यकर्त्यांनीही दिली आहे.

Swarajya organisation of sambhaji raje threatened chagan bhujbal to destroy his car on the issue of maratha reservation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub