विशेष प्रतिनिधी
नाशिक : स्वामी रामगिरी महाराजांची उद्या दि. 15 रोजी नाशिक मधील श्री काळाराम मंदिर ते रामतीर्थ गोदावरी अशी भव्य शोभायात्रा आयोजित केली असून सायंकाळी 6.30 वाजता दुतोंड्या मारुतीजवळ रामतीर्थावर त्यांच्या हस्ते गोदावरी पूजन आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. Swami Ramgiri Maharaj in Nashik tomorrow
स्वातंत्र्यापासून भारतीयांच्या मनात भरलेला अपराधगंड दूर करून भेदभावाला तिलांजली देऊन हिंदुत्वाचा हुंकार भरण्याची हीच वेळ असल्याची गर्जना यानिमित्ताने गंगा गोदावरीवर करण्यात येणार आहे.
सत्तास्थानी कुणीही असले, तरी ते हिंदू समाजाला कवडीमोल किमतीचे समजणारे राज्यकर्ते होते, हे भूतकाळातील अनेक सरकारांनी दाखवून दिले. पण इथून पुढे समस्त हिंदू समाजाचे मन आणि बुद्धी जागृत होईल, अशी आशा आणि अपेक्षा बाळगून रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या महाआरती उपक्रमात स्वामी रामगिरी महाराज सहभागी होत आशीर्वाद देणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App