प्रतिनिधी
बीड : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महाप्रबोधन यात्रा बीडमध्ये पोहोचत असतानाच सुषमा अंधारे मारहाण प्रकरण घडले आणि त्याचा फटका ठाकरे गटालाच बसला. उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर विश्वास ठेवत बीड जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव आणि संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांची तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी केली. sushma andhare crises to aappasaheb jadhav in shivsena
ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रेत संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र या सभेपूर्वीच ठाकरे गटातील अंतर्गत चापट्या वाद चव्हाट्यावर आला. गुरूवारी या सभेच्या निमित्ताने सुषमा अंधारे सभा स्थळाची पाहणी करण्यासाठी बीडमध्ये आल्या होत्या. यावेळी जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यासह सुषमा अंधारे यांचा वाद झाला. यानंतर आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर पैसे घेऊन पदे वाटप करत असल्याचा गंभीर आरोप केले आणि एकच खळबळ उडाली.
सुषमा अंधारे यांना मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी मोठी कारवाई केली. सुषमा अंधारे यांना दोन चापट्या मारल्याचा दावा करणाऱ्या जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव आणि जिल्हासंपर्क प्रमुख धोंडू पाटील यांचीही ठाकरे गटातून हकालपट्टी केली आहे. या दोन्ही जिल्हाप्रमुखांवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला. सुषमा अंधारे यांनी पक्षात दमदाटी सुरू केली आहे. त्या सतत पैसे देखील मागत आहेत, असा गंभीर आरोप अप्पासाहेब जाधव यांनी केला.
एकीकडे सुशांत प्रकरणावरून आदित्यला घेरणे, दुसरीकडे सुषमा अंधारेंना पाठबळ देणे; नेमका अर्थ काय??
– सुषमा अंधारेंनी फेटाळला मारहाण झाल्याचा दावा
आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा केला तरी तो सुषमा अंधारे यांनी फेटाळून लावला. आपल्याला कुठलीही मारहाण झाली नसल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. एखादा जिल्हाप्रमुखाने महिलेवर हात उचलला, असे जाहीरपणे म्हणतो. त्याला आपल्यावर पोलीस केस होईल याची भीती वाटत नाही. याचा अर्थ या जिल्हा प्रमुखाला शिंदे गट आणि गृह मंत्रालयाचे अभय आहे. त्यातूनच तो तसा बोलतोय. असे म्हणत महाप्रबोधन यात्रा दणक्यात होणार असल्याचा दावाही सुषमा अंधारे यांनी केला.
मात्र आपला जिल्हा प्रमुखच आपण नेमलेल्या उपनेते यावर पैसे घेऊन पदे वाटल्याचा आरोप करतो हे पाहून उद्धव ठाकरे यांनी आरोप करणाऱ्या आप्पासाहेब जाधव आणि त्यांच्याबरोबर धोंडू पाटील या दोघांचीही पक्षातून हकालपट्टी केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App