Sushant Singh Rajput Case : सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे सत्य काय आहे? सुशांतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली? सीबीआयने एक वर्षानंतरही स्पष्टीकरण दिलेले नाही. याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आले, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. Sushant Singh Rajput case is used to destroy image of Maharashtra and Mumbai Police says NCP Nawab Malik
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे सत्य काय आहे? सुशांतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली? सीबीआयने एक वर्षानंतरही स्पष्टीकरण दिलेले नाही. याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आले, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक म्हणाले, “जर कोणतीही घटना घडली तर त्याची चौकशी त्या घटनेशी संबंधित राज्यात केली जाते. त्या राज्याच्या तपास एजन्सींमार्फत केला जातो. पण सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात बिहार सरकारने खुनाचा गुन्हा नोंदवला आणि संपूर्ण प्रकरण सीबीआय तपासासाठी सोपवले. सीबीआय एका वर्षापासून या प्रकरणाची चौकशी करत आहे. ही हत्या होती की आत्महत्या, हे आतापर्यंत सांगता आलेले नाही.
बिहार निवडणुकीत राजकीय फायदा घेण्यासाठी सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा तापवण्यात आल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. असेच एक वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनीही केले आहे.
सचिन सावंत म्हणाले की, “एम्स पॅनलने सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्याचे नाकारून 300 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. आजही सीबीआय या विषयावर मौन बाळगून आहे. सीबीआयवर दबाव नाही का? अत्यंत प्रतिष्ठेचा प्रश्न उपस्थित झाला आहे सुशांत सिंग प्रकरणाच्या तपासात एका वर्षात कोणती प्रगती झाली? तपासाची स्थिती काय आहे? मोदी सरकारने महाराष्ट्राशी संबंधित तपास जाणीवपूर्वक अंतहीन ठेवण्याचे आदेश दिले आहेत का? या सीबीआयने त्वरित स्पष्टीकरण द्यावे,” अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली.
याविषयी पुढे बोलताना सचिन सावंत म्हणाले की, बिहार पोलिसांकडून सुशांत सिंह राजपूतच्या दुःखद मृत्यूच्या तपासाचा ताबा सीबीआयने घेतला. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. बिहार पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 177 चे उल्लंघन केले होते. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावरही आपला ठराव व्यक्त केला होता. पण मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याच्या आणि महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याच्या हेतूने हे भाजपचे षडयंत्र होते. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी बिहारचे तत्कालीन डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा वापर करण्यात आला. बिहार निवडणुकीत भाजपने सुशांतच्या मृत्यूचा वापर केला.
Sushant Singh Rajput case is used to destroy image of Maharashtra and Mumbai Police says NCP Nawab Malik
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App