न्यायाधीश आणि न्यायपालिकेवर आक्षेपार्ह पोस्ट, CBI कडून पाच जणांना अटक

cbi arrests five people for allegedly posting objectionable against judges and judiciary

cbi arrests five people : आंध्र प्रदेशमध्ये न्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी सीबीआयने 5 जणांना अटक केली असून या प्रकरणात एका खासदार आणि एका माजी आमदाराचीही चौकशी करण्यात आली आहे. लवकरच सीबीआय या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक करू शकते. cbi arrests five people for allegedly posting objectionable against judges and judiciary


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमध्ये न्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी सीबीआयने 5 जणांना अटक केली असून या प्रकरणात एका खासदार आणि एका माजी आमदाराचीही चौकशी करण्यात आली आहे. लवकरच सीबीआय या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक करू शकते.

सीबीआय प्रवक्ते आर. सी. जोशी यांच्या मते, सीबीआयने 11 नोव्हेंबर 2020 रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विविध गुन्हेगारी कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. याआधी आंध्र प्रदेश पोलिसांनी या प्रकरणात 16 आरोपींविरोधात 12 एफआयआर नोंदवले होते. आंध्र प्रदेश न्यायपालिकेने काही प्रकरणांमध्ये दिलेल्या आदेशानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी देण्यात आल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला होता. या टिप्पण्यांमुळे न्यायव्यवस्थेची प्रतिमा डळमळीत झाली.

आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने खुद्द याप्रकरणी सीबीआयला या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना तुरुंगात टाकण्याचे निर्देश दिले होते. सीबीआयच्या मते, या प्रकरणात प्राथमिक तपासादरम्यान 16 पैकी 13 आरोपींची ओळख पटली आणि 11 लोकांची चौकशी करण्यात आली आणि आतापर्यंत या प्रकरणात 5 लोकांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान सीबीआयला हेही समजले की, ज्या 16 आरोपींची नावे समोर आली आहेत, त्यापैकी तीन परदेशात आहेत.

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान या प्रकरणात वायएसआर काँग्रेसचे खासदार नंदीगाम सुरेश यांची चौकशी करण्यात आली. नंदीगाम सुरेश 2019 मध्ये वायएसआर काँग्रेसकडून बापटला आंध्र प्रदेशातून खासदार म्हणून निवडून आले. त्याचबरोबर ते अन्न व ग्राहक व्यवहार स्थायी समितीचे सदस्यही आहेत. यासोबतच वायएसआरचे माजी आमदार अमांची कृष्ण मोहन यांचीही चौकशी करण्यात आली.

सीबीआयच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये पी. आदर्श, एल. सांबा शिवा रेड्डी, धमु रेड्डी, पी. सुधीर, राजशेखर रेड्डी यांचा समावेश आहे. यापैकी राजशेखर रेड्डी याआधी कुवेतमध्ये काम करायचे.

सीबीआयचे म्हणणे आहे की, या प्रकरणाची तार परदेशातही जोडलेली आहे. त्यामुळे याप्रकरणी इंटरपोलचीही मदत घेतली जात आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी 3 जणांना रिमांडवर घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, या आरोपींच्या जागेवर छापे मारताना अनेक आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आले आहे, त्याचा तपास अजूनही सुरू आहे. एका आरोपीवर छापे मारताना त्याचा पासपोर्टही सापडला जो तो वेगळ्या नावाने वापरत होता. सीबीआय लवकरच यासंदर्भात वेगळा गुन्हा दाखल करणार आहे. लवकरच या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होऊ शकते.

cbi arrests five people for allegedly posting objectionable against judges and judiciary

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण