विनायक ढेरे
नाशिक : केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी जाहीर केलेल्या राष्ट्रीय सहकार धोरण मसुदा समितीमध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व आहे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली 47 जणांच्या या हाय प्रोफाईल समितीत महाराष्ट्राचे सहकार क्षेत्रातले दिग्गज समाविष्ट आहेत पण यामध्ये शरद पवारांचा समावेश मात्र नाही. Suresh Prabhu Chairman of National Cooperative Policy Drafting Committee
महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रावर शरद पवारांचे वर्चस्व आहे. सहकारी बँकांपासून सहकारी साखर कारखाने, सोसायट्यांपर्यंत पवारांची निष्ठावंत माणसे कार्यरत आहेत. राज्य सहकारी शिखर बँकेवर वर्षानुवर्षे पवारांचेच वर्चस्व राहिले आहे. त्याचे राष्ट्रीय पातळीवर देखील विविध पडसाद उमटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहकार या विषयामध्ये पवारांचे मार्गदर्शन घेत होते. परंतु 2019 नंतर हे चित्र बदलल्याचे दिसत आहे. एक तर पंतप्रधान मोदींनी प्रथमच सहकार हे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून त्याची पहिलीच सूत्रे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवली आहेत. आपोआपच अमित शाह यांच्यासारखा सर्वाधिक प्रभावी नेता सहकार मंत्री झाल्यानंतर तेथे दुसरा प्रभावी नेता टिकणे शक्य नव्हते. अमित शाह हे आपल्या पद्धतीने देशातला सहकार चालू इच्छितात. त्यांच्या या “स्कीम” मध्ये पवारांना फारसे स्थान दिसत नाही. त्यामुळे 2014 ते 19 दरम्यान महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रातल्या वर्चस्वाच्या आधारे पवारांची केंद्र स्तरावरच्या सहकार क्षेत्रावर जी मार्गदर्शक म्हणून विशिष्ट छाप होती, ती 19 नंतर पुसत चालल्याचे दिसून येत आहे.
केंद्रीय सहकार धोरण मसूदा ठरविण्यासाठी अमित शाह यांनी 48 जणांची समिती जाहीर केली आहे. तिच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना नेमले आहे त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातले सहकार क्षेत्रातले काही मोठी नावे देखील त्यामध्ये आहेत. पण या नावांमध्ये शरद पवारांचा समावेश नाही. त्याचबरोबर या समितीत एकही महिला देखील नाही. या मुद्द्यावर समितीच्या गठनावर टीका होत आहे. बाकी समितीमध्ये विविध राज्यांच्या सहकार क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे.
सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली समितीची पहिली बैठक 15 सप्टेंबर रोजी होईल त्यानंतर तीन महिन्याच्या आत केंद्रीय सहकार धोरणाचा मसुदा केंद्र सरकारला सोपवणे अपेक्षित आहे.
राष्ट्रीय सहकार धोरण मसूदा समिती
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App