कलाकारांना काम केल्याशिवाय पोट कसे भरणार? म्हणून कोल्हे यांनी गोडसेचं काम केलं आहे. त्यामुळे वावगं काही नाही.Surekha Punekar, following in the footsteps of Amol Kolhe, said, “An artist is an artist. He has to play any role.”
विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटावरून सध्या वाद सुरू आहे.दरम्यान प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा पुणेकर यांनी यावेळीअमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे.सुरेखा पुणेकर म्हणाल्या की ,”कलाकार हा कलाकार असतो. त्याला कोणतीही भूमिका करावी लागते”, असं सांगत सुरेखा पुणेकर यांनी कोल्हे यांचं समर्थन केलं आहे.
पुढे पुणेकर म्हणाल्या की ,अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. पण कलाकार हा कलाकार असतो. त्याला कोणत्याही भूमिका कराव्या लागतात. कारण त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असतो.कलाकारांना काम केल्याशिवाय पोट कसे भरणार? म्हणून कोल्हे यांनी गोडसेचं काम केलं आहे. त्यामुळे वावगं काही नाही.
तसेच ज्यावेळी कोल्हे यांनी कलाकार म्हणून काम करत होते त्यावेळी ते खासदार नव्हते. आता खासदार झाले आहेत. आता आडवं लावण्यात काहीही अर्थ नाही, असंही ते म्हणाले.आता अमरिश पुरी यांनी पाकिस्तानी नागरिकांच्या भूमिका वठवल्या आहेत. पण ते मनाने चांगले होते. देशप्रेमी होते. तसेच कोल्हे यांनी भूमिका केली यात काही वावगं नाही. कलावंत हा कोणतीही भूमिका करणारच, असं सुरेखा पुणेकर म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App