येत्या 25 जानेवारीला राज्य महिला आयोगाचा 29वा वर्धापन दिन मुंबईत पार पडणार


हा कार्यक्रम सोहळा कोरोनाचे सर्व निर्बंध लक्षात घेऊन ४५ लोकांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली.The 29th anniversary of the State Women’s Commission will be celebrated in Mumbai on January 25


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या स्थापनेला येत्या २५ जानेवारीला २९ वर्ष पूर्ण होत आहेत.यानिमित्ताने मुबई मध्ये यशवंतराव चव्हाण केंद्रातील ‘रंगस्वर सभागृहात’वर्धापनदिनाचा कार्यक्रम होणार आहे.तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम सोहळा कोरोनाचे सर्व निर्बंध लक्षात घेऊन ४५ लोकांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली.विशेष म्हणजे वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमात राज्यातील महिलांसाठी टोल फ्री क्रमांकाचे अनावरण करण्यात येणार आहे.



सोबतच महिला आयोगाने तयार केलेल्या कॅलेंडर व डायरीचे देखील अनावरण या दिवशी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे.तसेच कार्यक्रमासाठी महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, विधानसभा उपसभापती निलम गोऱ्हे, महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष ज्योती ठाकरे, पोलीस महासंचालक संजय पांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यासोबत श्रीमती प्रियांका सावंत, श्रीमती निर्मला सावंत-प्रभावळकर, श्रीमती विजया रहाटकर,श्रीमती सुशिबेन शाह , तसेच चंद्रा अय्यंगार, अ.ना. त्रिपाठी, आस्था लूथरा, श्रद्धा जोशी, महिला आयोगाच्या माजी सदस्य सचिव देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

The 29th anniversary of the State Women’s Commission will be celebrated in Mumbai on January 25

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात