विशेष प्रतिनिधी
पुणे : मुंबई क्रुझ ड्रग प्रकरणामध्ये अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात बरेच मोठे खुलासे केले होते. वेळोवेळी त्यांनी समीर वानखेडे यांच्यावरदेखील आरोप केलेच होते. या काळात भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, ‘त्यांच्यासारखे नेते मी माझ्या खिशात ठेवतो’ या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Supriya Sule’s reply to Chandrakant Dada Patil’s ‘that’ statement on nawab malik
त्या म्हणतात, ‘माझ्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार झालेत. चंद्रकांतदादा पाटील यांनी वापरलेली भाषा माझ्या तरी ऐकण्यात किंवा वाचवण्यातही नाहीये’. पुण्यात एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
WATCH : ईडीची नोटीस म्हणजे फॅशन झाली आहे – खा. सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात एका गुंडाच्या पत्नीकडून चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार झाल्याच्या घटनेवर ही भाष्य केले आहे. त्या म्हणतात, राज्यातील एक वरिष्ठ नेते असे म्हणाले होते की, साम दाम दंड भेद वापरून आम्ही काहीही करून कोणालाही विकत घेऊ शकतो. त्यामुळे ही तत्त्वाची लढाई नाही तर फक्त सत्तेत राहण्यासाठी चालू असलेली लढाई आहे असे त्या म्हणाल्या. हे खूप दुर्दैवी आहे.
पुढे त्या म्हणतात, अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये भाजप हा एक खूप जबाबदार पक्ष होता. त्यावेळी नागरीक त्यांच्याकडे अपेक्षेने पाहायचे. आज आम्हाला एरवी तत्त्वज्ञान सांगणारे तेच लोक गुंडांसोबत दिसत आहेत. ही खूपच दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App