लाडक्या बहिणीवरून सुप्रिया सुळेंचा अजितदादांना टोला; पण अजितदादांऐवजी रावसाहेब दानवेंनी हाणला प्रतिटोला!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आता त्यांना लाडके भाऊ बहीण सगळे आठवतील, अशा शब्दांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्थमंत्री अजित पवारांना त्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून टोला हाणला. पण अजित पवार यांच्या ऐवजी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सुप्रिया सुळे यांना प्रतिटोला हाणला. Supriya Sule’s advice to Ajit Dada over ladki bahin yojana

विधानसभा तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागले आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. पण लाडकी बहीण योजनेवरुन सुप्रिया सुळेंच्या टीकेवर भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री  रावसाहेब पाटील दानवे यांनी पलटवार केला. महिलांसंदर्भात असं बोलणं त्यांना शोभत नाही, असे दानवे म्हणाले.

रावसाहेब दानवे म्हणाले, सुप्रिया सुळे यांचे वडील राज्याचे अनेक वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्या देखील महिला असून त्यांनी महिलांच्या संदर्भात अशा पद्धतीच्या बोलणं हे त्यांच्या पदाला शोभा देत नाही.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

विधानसभा तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागले आहेत.  सध्या जुमल्यांचा पाऊस पडतोय.  मागील सव्वा वर्षापासून राज्याच्या गृह विभागाच्या कारभार बिघडला आहे.  राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात बरेच घोळ झाल्याचे आपण बघितलं.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महिलावर्गाला खुश करण्याचा प्रयत्न केला आह. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. जुलै 2024 पासून अंमलबजावणी होणार आहे.  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्काळ लागू झाली आहे. पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. या योजना अंर्तगत  लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रति माह दिले जाण्याची शक्यता आहे. कमीतकमी 3.50 कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणं आवश्यक आहे. किमान वयाची 21 वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत ही योजना लागू राहणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणं आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावं.

मात्र या योजनेवरून खासदार सुप्रिया सुळे आणि माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्यात जुंपली.

Supriya Sule’s advice to Ajit Dada over ladki bahin yojana

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात