विशेष प्रतिनिधी
पुणे : सकाळ आणि साम टीव्हीने घेतलेल्या सर्वेत अजितदादांवर सुप्रिया सुळे भारी, तर पवारांचा पक्ष ठाकरेंच्या पक्षावर भारी ठरला आहे. Supriya Sule dominates Ajitdada in the Sakaal survey
सकाळ आणि साम टीव्हीने महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघांमधल्या एकूण 81529 मतदारांचा रँडम सर्वे केला. यात 68 % पुरुष, तर 31 % महिलांचा समावेश होता. या सर्वेच्या निष्कर्षात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर मतांच्या टक्केवारीत मात केलेली दाखवली आहे, तर सुप्रिया सुळे अजितदादांना भारी ठरल्याचे दाखविले आहे.
महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपला सर्वाधिक पसंती दिली असून भाजपला 28.5 %, त्या खालोखाल काँग्रेसला 24 %, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 14 %, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 11.7 %, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 6 %, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला 4.2 % पसंती दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत जरी ठाकरे यांच्या शिवसेनेला पवारांच्या राष्ट्रवादी पेक्षा जास्त मते मिळाली असली, तरी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सकाळ आणि साम टीव्हीने केलेल्या सर्वेत मात्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त टक्केवारी मिळाल्याचे दिसत आहे.
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सुप्रिया सुळे या अजितदादांवर भारी ठरल्याचे टक्केवारी दाखवत आहे. अर्थात या शर्यतीत देखील देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हेच इतर सगळ्यांपेक्षा भारी ठरले आहेत. त्यांना प्रत्येकी 22.4 % अशी समान टक्केवारीत मतदारांनी पसंती दिल्याचे दाखवले आहे. मुख्यमंत्री पदासाठी सुप्रिया सुळे 6.8 % मते घेऊन अजितदादांवर भारी ठरल्याचे दाखविले असून अजितदादांना 5.3 % मतदारांनी पसंती दिल्याचे दाखवले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App