विशेष प्रतिनिधी
पुणे : Supriya sule मोठा गाजावाजा करून हर्षवर्धन पाटलांनी इंदापुरात हातातले कमळ बाजूला सारून तुतारी फुंकली; पण सुप्रिया सुळेंनी प्रयत्न करूनही त्यांच्या राष्ट्रवादीतली नाराजीची मशाल नाही विझली!!, हा प्रकार इंदापुरात पाहायला मिळाला.
हर्षवर्धन पाटलांच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशाबद्दल नाराज असलेल्या 3 पवारनिष्ठ नेत्यांनी खुद्द शरद पवार हजर राहिलेल्या हर्षवर्धन पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेश कार्यक्रमाला दांडी मारली. आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने आणि भरत शहा हे कार्यक्रमाला आले नाहीत. त्यांनी नाराज राहू नये. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, यासाठी खुद्द सुप्रिया सुळे यांनी प्रयत्न करून पाहिले. परंतु, ते अयशस्वी ठरले.
Congress : काँग्रेसचे उत्तरेतले पुनरुज्जीवन प्रादेशिक पक्षांच्या मूळावर; महाराष्ट्रातही सत्ता खेचायचा “डाव” ठाकरे + पवारांच्या बळावर!!
राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर आमदार दत्तामामा भरणे अजित पवारांच्या गोटात गेले. त्यामुळे आप्पासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून उमेदवारीच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. दोन्ही नेते आपापल्या पातळीवर प्रचाराला देखील लागले होते. परंतु आयत्या वेळेला शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन तुतारी फुंकयला लावली. त्यामुळे अप्पासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने यांचे तिकीट परस्पर कापले गेले. त्यामुळे ते नाराज झाले. त्याचबरोबर भरत शहा आणि सोनाई समूहाचे प्रमुख दशरथ माने यांची देखील नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसला सहन करावी लागली.
वास्तविक हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशापूर्वी या सगळ्या नेत्यांची स्वतः सुप्रिया सुळे बोलल्या होत्या. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सुप्रिया सुळे यांच्या शिष्टाईला इंदापुरातले हे “पवारनिष्ठ” नेते बधले नाहीत. त्यांनी हर्षवर्धन पाटलांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या वेळी हजेरी लावली नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासारख्या ज्येष्ठ खासदाराची शिष्टाई कमी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App