Land For Job Scam आता या प्रकरणी पुढील सुनावणी 25 ऑक्टोबरला होणार आहे.
विशेष प्रतिनिधी
पाटणा : नोकरीसाठी जमीन घोटाळा प्रकरणात लालू यादव कुटुंबीयांना दिल्ली न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. वास्तविक, लॅण्ड फॉर जॉब घोटाळ्याप्रकरणी राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने लालू कुटुंबीयांना जामीन मंजूर केला आहे. आज लालू कुटुंब सकाळी 10 वाजता दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर झाले. लालू यादव आणि त्यांची मुले तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव हेही दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर झाले.
लालू यादव यांच्यासह सर्व 9 आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येकाला एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला. प्रत्येकाला त्यांचे पासपोर्ट जमा करावे लागतील आणि परवानगीशिवाय प्रवास करणार नाही. यासोबतच प्रत्येकाला आरोपपत्राची प्रत देण्यास सांगण्यात आले. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 25 ऑक्टोबरला होणार आहे. Land For Job Scam
या प्रकरणात तेज प्रताप यादव पहिल्यांदाच हजर झाले. ईडीने आरोपींविरुद्ध 6 ऑगस्ट रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात 11 आरोपींची नावे आहेत. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. परंतु न्यायालयाने म्हटले की, प्रथमदर्शनी असे दिसते की लालूंचा मोठा मुलगाही या घोटाळ्यात सामील आहे.
जामिनाच्या मुख्य अटी-
लालू कुटुंबीयांना त्यांचा पासपोर्ट सरेंडर करावा लागणार
न्यायालयाच्या परवानगीशिवाय ते परदेशात जाऊ शकणार नाहीत.
सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने या प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड केली जाणार नसल्याचे सांगितले.
जामीन मिळण्यासाठीची एक अट म्हणजे साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे प्रभाव पडणार नाही.
या प्रकरणातील जामीनाच्या अटींपैकी एक म्हणजे एक लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक भरावा लागेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App