विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या मुंबईसह सर्व महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढायच्या उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर शरद पवारांचा गट भंजाळला. त्यांच्या दोन नेत्यांच्या प्रतिक्रिया परस्परविरोधी दिशांना गेल्या.
मुंबईसह महाराष्ट्रातल्या सर्व महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वतंत्रपणे लढवेल, असे खासदार संजय राऊत यांनी जाहीर करून टाकले. त्यामुळे महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोडीत निघाली. काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून ठाकरेंच्या निर्णयावर टीका करणाऱ्या प्रतिक्रिया आल्या, पण त्याच वेळी दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी हतबलता देखील व्यक्त केली.
उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर प्रामुख्याने शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भंजाळली. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, त्यावरून हे सिद्ध झाले.
उद्धव ठाकरे स्वतंत्र असल्यामुळे लढणार असल्यामुळे महाविकास आघाडीचे 100 % नुकसान होणार हे उघड दिसते, पण त्यांचा पक्ष वेगळा असल्यामुळे ते स्वतंत्र निर्णय घ्यायला समर्थ आहेत. त्याला आम्ही काय करू शकतो??, अशी हतबलता जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.
त्या उलट सुप्रिया सुळे यांनी ठाकरेंच्या निर्णयाला अप्रत्यक्ष पाठिंबा व्यक्त केला. महापालिका, जिल्हा परिषदा किंवा पंचायत समितीच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्याच असतात. महाविकास आघाडी एकत्र असताना देखील आम्ही त्या स्वतंत्र लढल्या होत्या. वरती कुठली ऍडजेस्टमेंट करून निवडणुका लढवायच्या, तर कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्याच उचलायचा का??, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. पवारांच्याच राष्ट्रवादीतल्या दोन नेत्यांच्या प्रतिक्रिया अशा परस्परविरोधी दिशांनी गेल्यामुळे पवारांची राष्ट्रवादी पूर्ण भंजाळली असल्याचे “सत्य” महाराष्ट्रासमोर आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App